जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनलसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे यंदाची आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. त्यानंतर खेळाडूंनी आपले लक्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटकडे वळवले आहे. भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. जूनच्या पहिल्याच आठवड्यात भारतीय खेळाडू इंग्लंडसाठी रवाना होणार आहेत. तसेच भारतीय संघ पुढील महिन्यात १८ ते २३ जून या कालावधीत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये न्यूझीलंडचा सामना करणार आहे.

या फायनलनंतर भारत इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका खेळणार आहे. या ४ महिन्यांच्या दौऱ्यासाठी बीसीसीआयने आज टीम इंडियाची घोषणा केली आहे. कोरोनाच्या संकटकाळात इंग्लंडमध्ये सराव सामन्यांचे आयोजन होणं, अवघड आहे. त्यामुळे बीसीसीआयने एक जम्बो संघ पाठवून त्यातून दोन संघ तयार करून टीम इंडियाला सराव करता येईल.

भारतीय संघ खालीलप्रमाणे
भारतीय संघ – विराट कोहली ( कर्णधार), अजिंक्य रहाणे( उपकर्णधार) , रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, उमेश यादव तसेच लोकेश राहुल व वृद्धीमान सहा यांची निवड फिटनेस टेस्टनंतर करण्यात येणार आहे.

राखीव खेळाडू – अभिमन्य इस्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागवास्वाला

You might also like