हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी क्रिकेटपटू सुनील जोशी आता भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे नवे प्रमुख असणार आहेत. विद्यमान निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांची जागा आता जोशी घेतली. बीसीसीआयच्या पाच जणांच्या निवड समितीने बुधवारी ही घोषणा केली. निवड समितीच्या प्रमुखपदासाठी बीसीसीआयकडून माजी फिरकीपटू लक्ष्मण शिवरामनकृष्णन, राजेश चौहान, हरिंद्रर सिंह, वेंकटेश प्रसाद या पाच जणांच्या मुंबईत मुलाखती घेण्यात आल्या होत्या. या मुलाखती अंती निवड समितीचे प्रमुख म्हणून माजी क्रिकेटपटू सुनील जोशी यांची निवड करण्यात आली.
निवड समितीचे प्रमुख म्हणून जोशी यांच्या अध्यक्षतेखालील समितीला येत्या १२ मार्चपासून होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करावी लागणार आहे.
जोशी यांची क्रिकेट कारकीर्द
सुनील जोशी यांनी भारताकडून १५ कसोटी आणि ६९ वनडे सामने खेळले आहेत. कसोटीत त्यांनी ४१ तर वनडेत ६९ विकेट घेतल्या आहेत. जोशी यांनी कसोटीत ९२ तर वनडेत नाबाद ६१ ही सर्वोच्च खेळी केली होती. याशिवाय त्यांनी १६० प्रथम श्रेणी आणि लिस्ट ए मधील १६३ सामने खेळले आहेत.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.




