बीसीसीआयने घातली मुंबईच्या ‘या’ खेळाडूवर आयपीएल खेळण्यावर बंदी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । बीसीसीआयच्या नियमानुसार निवृत्ती घेतल्यानंतरच भारतीय खेळाडूंना अन्य देशातील लीगमध्ये खेळता येते. जर खेळाडू आयपीएलमध्ये खेळणार असतील तर त्यांना अन्य देशांच्या लीगमध्ये खेळता येत नाही. याच नियमाचे उल्लंघन कोलकाता नाईट रायडर्सने विकत घेतलेल्या मुंबईच्या प्रवीण तांबेने केल्याने बीसीसीआने त्याला यावर्षी आयपीएलमध्ये खेळण्यावर बंदी घातली आहे.

Untitled design - 2020-01-13T175014.975.jpg

मिळालेल्या सविस्तर वृत्तानुसार, तांबेने गेल्या वर्षी अबुधाबी आणि शारजाह येथे झालेल्या टी-१० लीगमध्ये भाग घेतला होता. बीसीसीआयच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी कारवाईचे पाऊल उचलले. तांबेला यंदा शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्ससंघाने २० लाख रुपयांना विकत घेतले होते.

पण आता याच खेळाडूवर बंदी घातली गेल्यानं नाइट रायडर्स संघाला झटका बसला आहे. आयपीएलच्या लिलावात यंदा सर्वात जास्त वयाचा खेळाडू म्हणून ४८ वर्षीय प्रवीण तांबेची चर्चा झाली होती. बीसीसीआयच्या कारवाईनंतर येत्या मार्च-एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या १३व्या हंगामात तांबे खेळू शकणार नाही.

Leave a Comment