बंगळुरु : वृत्तसंस्था – नॅशनल क्रिकेट अकादमीत नोकरीची संधी निघाली असून चार पदांसाठी जागा निघाल्या आहेत. या पदांसाठी BCCI ने अर्ज मागवले असून अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर आहे. तसंच वयाची अटही 60 वर्षांखालील व्यक्ती इतकीच आहे. BCCI ने अधिकृत संकेतस्थळावर याबाबची सर्व माहिती दिली आहे. या पदांमध्ये फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक यांचा समावेश आहे. यामध्ये गोलंदाजी प्रशिक्षकात फिरकी गोलंदाजी आणि वेगवान गोलंदाजी अशी दोन पद असून एकूण चार पदासांठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
बीसीसीआयने NCA मधील 11 प्रशिक्षकांचा वार्षिक करार पुन्हा नव्याने करण्यासाठी मनाई केली असता ही सर्व पदं उपलब्ध झाली आहेत. करार न करण्यात आलेल्यांमध्ये भारताचे माजी क्रिकेटपटुंचा समावेश आहे. ज्यामध्ये ऋषिकेश कानिटकर, रमेश पोवार, सुजीत सोमसुंदर, सुबर्तो बॅनर्जी आणि शिव सुंदर दास यांची नावं होती. यातील शिव सुंदर दास हे भारतीय महिला क्रिकेट संघाचे फलंदाजी प्रशिक्षक आहेत. तर रमेश पोवार मुख्य प्रशिक्षक आहेत.
बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटसाठी नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये रणजी करंडक स्पर्धेचा 2021-22 चे सत्र 5 जानेवारी ते 20 मार्च दरम्यान खेळवण्यात येणार आहे. कोविड -19 च्या साथीमुळे मागच्या वर्षी रणजी ट्रॉफी खेळवण्यात आली नव्हती. या वर्षी हि रणजी ट्रॉफी खेळवण्यात येणार आहे. वरिष्ठ पुरुष क्रिकेटची सुरुवात 27 ऑक्टोबरपासून सय्यद मुश्ताक अली करंडकाने होणार आहे. जी सर्वोत्तम क्रिकेटपटूंची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी इंडियन प्रीमियर लीग नंतर आयोजित करण्यात येणार आहे.