Tuesday, June 6, 2023

विराट कोहलीचे कर्णधारपद जाणार?? जय शाह म्हणतात…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 2022 T-20 विश्वचषक स्पर्धेनंतर कर्णधार विराट कोहली हा T20 आणि एकदिवसीय क्रिकेटचे कर्णधारपद सोडून आक्रमक सलामीवीर रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार होणार अशा बातम्या देशभर वाऱ्यासारख पसरल्या. दरम्यान या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्पष्ट केले.

जय शाह म्हणाले, कर्णधार बदलण्याचा प्रश्नच नाही. सध्या भारतीय संघ जी कामगिरी करत आहे, ती चांगली होत ​​आहे. त्यामुळे कर्णधारपद बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही”. ते इंडियन एक्स्प्रेसशी बोलत होते. त्यामुळे भारतीय संघात कोणतेही फेरबदल होणार नाहीत हे आता स्पष्ट झाले आहे.

यावेळी जय शाह म्हणाले, इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने 2-1 ने आघाडी घेतली. इतकंच नाही तर टी 20 मध्ये विराटच्या नेतृत्त्वात टीम इंडियाच्या जबरदस्त कामगिरी केल्याचंही शाह म्हणाले. कोहलीच्या नेतृत्त्वात टीम इंडिया टी 20 किंवा वन डेमध्ये सहसा पराभूत झालेली नाही असेही त्यानी म्हंटल.