Wednesday, March 29, 2023

न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; जखमी शिखर धवनच्या जागी ‘या’ खेळाडूला संधी

- Advertisement -

टीम हॅलो महाराष्ट्र : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) न्यूझीलंड दौर्‍यासाठी एकदिवसीय संघ जाहीर केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्‍या वनडे सामन्यात दुखापतग्रस्त स्टार फलंदाज शिखर धवनच्या जागी विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनचा टी -२० संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर पृथ्वी शॉला एकदिवसीय संघात स्थान मिळालं आहे. सध्या मंडळाने कसोटी संघाची घोषणा केलेली नाही.

- Advertisement -

न्यूझीलंड दौरा 24 जानेवारीपासून सुरू होईल

न्यूझीलंडचा भारत दौरा 24 जानेवारीपासून सुरू होत आहे. या दौर्‍यावर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध 5 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने, 3 वनडे आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. 

भारतीय संघ टी -20 आंतरराष्ट्रीय मालिकेसह कीवी भूमीवर प्रारंभ करणार आहे. त्यानंतर वनडे आणि कसोटी सामने खेळले जातील. टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध 5 ते 11 फेब्रुवारी दरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. यानंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका 21 फेब्रुवारी ते 4 मार्च दरम्यान खेळली जाईल.

टी -20: टीम इंडिया संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, संजू सॅमसन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, रवींद्र जडेजा , शार्दुल ठाकूर.

वनडे: टीम इंडिया संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी , केदार जाधव