MS Dhoni : धोनीसाठी कायपण!! BCCI बदलणार IPL चा ‘तो’ नियम? चेन्नईला काय फायदा?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IPL 2025 साठी मेगालीलाव घ्यायचा का? किती प्लेयर्स रिटेन करण्याची मुभा द्यायची? यावरून BCCI आणि IPL फ्रेंचायजी मध्ये चर्चा सुरु आहे. बीसीसीआयने अद्याप जाहीर केलं नाही कि, मेगा लिलावासाठी किती खेळाडू कायम ठेवता येईल. मात्र महेंद्रसिंघ धोनीसाठी (MS Dhoni) बीसीसीआय ५ वर्षांपूर्वीचा जुना नियम बदलण्याच्या तयारीत असल्याचे बोललं जात आहे. जर हा नियम खरोखऱच बदलला तर धोनी आयपीएल 2025 मध्ये अनकॅप्ड खेळाडू म्हणून खेळताना दिसेल. आणि चेन्नई सुपर किंग्सच्या पैशांची बचत होईल.

आयपीएल मध्ये 2021 पर्यंत एक नियम होता कि, ज्या खेळाडूने ५ वर्षांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो खेळाडू अनकॅप्ड म्हणून आयपीएलच्या लिलावात उतरू शकतो, मात्र 2021 नंतर हा नियम बंद करण्यात आला कारण कोणत्याही फ्रँचायझीने या नियमाचा कधीच वापर केला नाही किंवा करावा लागला नाही. परंतु 31 जुलै रोजी BCCI सोबत झालेल्या बैठकीत चेन्नई सुपर किंग्सने पुन्हा एकदा हा नियम नव्याने सुरु करण्याची विनंती केली होती. CSK ची हि विनंती BCCI मान्य करण्याची शक्यता असून असं झाल्यास महेंद्रसिंघ धोनी अनकॅप्ड प्लेयर्सच्या रूपात आयपीएल लिलावात उतरू शकतो.

दरम्यान, एका कार्यक्रमात बोलताना आपल्या आयपीएलमधील भविष्याबाबत बोलताना म्हंटल होते कि, IPL 2025 अजून बराच वेळ आहे. आता चेंडू आमच्या पारड्यात नाही. एकदा का नियम जाहीर झाले की मी निर्णय घेईन. खेळाडूंना कायम ठेवण्याबाबत काय निर्णय होतो तो बघूया, त्यानंतर मी निर्णय घेईन आणि हा निर्णय संघाच्या हिताचा असेल असं माहीने सांगितलं. त्यामुळे बीसीसीआयच्या निर्णयावरच धोनीचे आयपीएल मधील भविष्य अवलंबून असेल हे स्पष्ट आहे आणि धोनीला सुद्धा याची जाणीव आहे.

चेन्नई सुपर किंग्सचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी मात्र धोनी पुढील वर्षी चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळेल अशी आशा व्यक्त केली होती. आम्ही नेहमी त्याच्या निर्णयाचा आदर करतो. मला आशा आहे की तो लवकरच निर्णय घेईल. मात्र, तो पुढील वर्षी चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळेल अशी आम्हाला खूप आशा आहे, आणि ही चाहत्यांची आणि माझीही इच्छा आहे, असं काशी विश्वनाथन म्हणाले होते. आपणा सर्वांना माहिती आहे की, धोनी स्वतःचे निर्णय स्वतःच घेतो आणि धोनीने योग्य वेळी ते जाहीर सुद्धा केले आहेत . परंतु आम्हाला खूप आशा आहे की तो पुढील वर्षी CSK साठी उपलब्ध असेल.