जुनी नाणी किंवा नोटा विकण्यापूर्वी सावधगिरी बाळगा, RBI ने जारी केली महत्वाची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । गेल्या काही दिवसांपासून जुनी नाणी आणि नोटा (Old Note and Coin) खरेदी आणि विक्री संदर्भात अनेक बातम्या समोर येत आहेत. लोकं विविध ऑनलाइन आणि ऑफलाइन प्लॅटफॉर्मद्वारे जुन्या नोटा आणि नाणी विकत आहेत. RBI ने अलीकडेच यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती जारी केली आहे. RBI ने सावध केले की, काही फसवणूक करणारे घटक ऑनलाइन, ऑफलाइन प्लॅटफॉर्मवर जुन्या नोटा आणि नाणी विकण्यासाठी केंद्रीय बँकेचे नाव आणि लोगो वापरत आहेत.

जर तुम्ही जुनी नाणी आणि नोटा विकण्याची किंवा खरेदी करण्याची तयारी करत असाल तर काळजी घ्या. ऑनलाइन फसवणूक करणारे सतत ग्राहकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यासाठी तो रोज नवनवे मार्ग शोधतात.

RBI ने ट्विट करून काय म्हटले ते जाणून घ्या
रिझर्व्ह बँकेने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, “भारतीय रिझर्व्ह बँकेच्या लक्षात आले आहे की, काही घटक भारतीय रिझर्व्ह बँकेचे नाव आणि लोगो चुकीच्या पद्धतीने वापरत आहेत आणि विविध ऑनलाइन, ऑफलाइन प्लॅटफॉर्मद्वारे जुन्या नोटा बदलण्यासाठी आणि पैसे/कमिशन किंवा नाणी विकण्यासाठी टॅक्स विचारत आहेत.

रिझर्व्ह बँकेने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, ते अशा कोणत्याही कार्यात सामील नाही आणि अशा व्यवहारासाठी कधीही कोणाकडून कोणतेही शुल्क किंवा कमिशन मागणार नाही. त्याच वेळी, बँकेने असेही म्हटले आहे की, अशा उपक्रमांसाठी कोणत्याही संस्थेला किंवा व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे अधिकृतता दिलेली नाही.

RBI चा कोणाशीही करार नाही
भारतीय रिझर्व्ह बँक अशा प्रकरणांमध्ये व्यवहार करत नाही किंवा कधीही कोणाकडूनही असे कोणतेही शुल्क किंवा कमिशन मागत नाही. अशा व्यवहारांवर रिझर्व्ह बँकेच्या वतीने कोणतेही शुल्क किंवा कमिशन आकारण्याचा अधिकार भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणत्याही संस्था, कंपनी किंवा व्यक्ती इत्यादींना दिलेला नाही. भारतीय रिझर्व्ह बँक सामान्य लोकांना अशा खोट्या आणि फसव्या ऑफरला बळी पडू नये असा सल्ला देते.