कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असून प्रशासनाने वारंवार सांगुनही विनाकारण फिरणार्यांची संख्या कमी होत नाही. या पार्श्वभुमीवर पोलिसांनी आरोग्य पथकाच्या सहकार्याने विनाकारण फिरणारांना पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाईबरोबरच त्यांची कोरोना टेस्ट केली जात आहे. कोरोना टेस्टचा रिपोर्ट आल्यानंतर वाहनधारकांवर पुढील कार्यवाही केली जात आहे.
कराड तालुक्यात कोरोनाच्या आकड्यांनी अडीचशेचा टप्पा ओलांडला आहे. कोरोना प्रार्दुभाव वाढू नये म्हणून प्रशासन वारंवार विनाकारण बाहेर न फिरण्याचे आवाहन करत आहेत. मात्र काही नागरिक खोटे कारण सांगून बिनधास्त वावरत आहेत. अशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कराड शहरात जाणार्या रस्त्यांवर पोलिसांनी चेकपोस्ट तयार केले आहेत. कोल्हापूर नाक्यावरील चेकपोस्टवर मंगळवारपासून आरोग्य विभागाचे पथक तैनात करण्यात आले आहे. एक रूग्णवाहिकाही उभी करण्यात आली आहे.
कोल्हापूर नाका येथे प्रत्येक नागरिकाची पोलीस चौकशी करत असून विनाकारणच बाहेर फिरत असल्याचे आढळून आल्यास त्यांची रॅपीट ऍण्टीजन टेस्ट करत आहेत. दुपारपासून 62 जणांना विनाकारण फिरताना पकडून त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. कोल्हापूर नाक्यावर यापुढेही अशा प्रकारे तपासणी सुरू राहणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विजय गोडसे यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा