पाणीपुरी खात असाल तर सावधान !!! पाणीपुरीच्या गाडीवर स्वच्छता गृहातील पाण्याचा उपयोग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पाणीपुरीच्या गाडीवर सार्वजनिक शौचालयाच्या टाकीतील पाणी वापरलं जात असल्याचा संताप वाढवणारा प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा प्रकार कोल्हापुरात समोर आला आहे. रंकाळा चौपाटी परिसरात हा गलिच्छ प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर या परप्रांतीय पाणीपुरी विक्रेत्याच्या गाडीची अज्ञात तरुणांनी नासधूस केली.

दरम्यान कोल्हापूर शहरातील एक महत्त्वाचे पर्यटन ठिकाण असलेल्या खराडे कॉलेजसमोरील रंकाळा तलाव परिसरातील पाणीपुरी विक्रेत्याचा गलिच्छ कारभार समोर आला. हा पाणीपुरी विक्रेता हातगाडीवर शौचालयाच्या टाकीतील पाण्याचा वापर करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हेच पाणी ग्राहकांसाठी पिण्यासाठी ठेवलं जात होतं.

या जीवघेण्या प्रकाराविरोधात सोशल मीडियात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. व्हिडिओ व्हायरल होताच अवघ्या काही तासात भागातील नागरिकांनी संबंधित हात गाडी चालकाला कोल्हापूरी हिसका दाखवत त्याचा ठेला उध्वस्त केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment