Credit Card चे पूर्ण लिमिट वापरत असाल तर आताच व्हा सावध… अन्यथा होऊ शकेल नुकसान !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या खरेदीसाठी Credit card वापरण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. काही क्रेडिट कार्ड ग्राहकांना 3 महिन्यांपर्यंत इंटरेस्ट फ्री क्रेडिट देतात. म्हणूनच अनेक लोकं क्रेडिट कार्डद्वारे खरेदी करण्यास पसंती देतात. मात्र, जर आपण क्रेडिट कार्ड लिमिटचा पुरेपूर वापर केला तर याद्वारे काय नुकसान होते याची आपल्याला माहिती आहे का ???

SME: The intelligent use of credit cards by SMEs

क्रेडिट लिमिट म्हणजे काय ???

Credit card द्वारे जास्तीत जास्त रक्कम खर्च करता येणारी लिमिट म्हणजे क्रेडिट कार्ड लिमिट. Credit card चे फायदे आणि वैशिष्ट्यांच्या आधारावर क्रेडिट लिमिट ठरवली जाते. यामध्ये लिमिट निश्चित करण्याचा अधिकार बँकेकडे आहे. वेगवेगळ्या बँकाकडून यासाठी वेगवेगळे निकष लावले जातात. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरताना नेहमी काळजी घ्या आणि बॅलन्सची माहिती ठेवा.

How is the credit card limit decided? - Quora

कमी होऊ शकेल क्रेडिट लिमिट

जर क्रेडिट कार्डधारक वारंवार क्रेडिट बॅलन्स झिरो करत असेल तर बँक अशा ग्राहकाचे क्रेडिट लिमिट कमी करू शकते. यामागील कारण असे की यामुळे बँकेला असे वाटू शकते कि सदर ग्राहक बँकेच्या कर्जाची परतफेड करू शकणार नाही. तसेच क्रेडिट मर्यादा कमी झाल्याने क्रेडिट स्कोअर आपोआपच कमी होतो.

How to increase Credit Card limit? | CardInfo

क्रेडिट स्कोअर खराब होऊ शकेल

जेव्हा क्रेडिट लिमिट पूर्णपणे वापरली जाते तेव्हा क्रेडिट युटिलायझेशन रेशो (CUR) वाढतोते. ज्यामुळे Credit card धारकाचा क्रेडिट स्कोअर खराब होतो. यामुळे भविष्यात कर्ज मिळणे अवघड होईल. हे लक्षात घ्या कि, क्रेडिट स्कोअरिंग एजन्सी द्वारे क्रेडिट युटिलायझेशन रेशो ठरवला जातो. तसेच आपण क्रेडिट कार्ड किती वापरतो यावर क्रेडिट युटिलायझेशन रेशो अवलंबून असतो.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bankbazaar.com/credit-card.html

हे पण वाचा :

Indian Railway : तत्काळ तिकीट बुकिंगद्वारे अशा प्रकारे मिळवा कन्फर्म सीट !!!

शेअर मार्केट मध्ये Pump and Dump द्वारे अशा प्रकारे केली जाते फसवणूक !!!

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा वाढ, नवीन भाव पहा

BSNL च्या ग्राहकांना धक्का ! कंपनीने ‘या’ 3 प्रीपेड प्लॅनमध्ये केला मोठा बदल

आता ‘या’ शेतकऱ्यांनाच दिला जाणार PM Kisan चा12 वा हप्ता !!!

Leave a Comment