सावधान! शहरात पुन्हा एकदा रुग्णसंख्या दोनशेपार

corona
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या 24 तासात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या 200 पार गेली आहे. दिवसभरात 211 नव्या कोरोना रूग्णांची वाढ झाली आहे.
यात शहारातील 63, तर ग्रामीण भागातील 148 रुग्णांचा समावेश आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यातील 11 रुग्णांचा मृत्यू झाला, तर अन्य जिल्ह्यातील तीन रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या 2 हजार 567 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

औरंगाबादेत काही दिवसापासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दिलासा व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील रुग्ण संख्या दीडशेच्या घरात आली. रुग्णसंख्या घटल्याने निर्बंधही कमी केले जात आहेत. या सगळ्यात मात्र गेल्या चार दिवसापासून कोरोनाचा आलेख काढताना पाहायला मिळत आहे.

जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 43 हजार 664 एवढी झाली आहे. आतापर्यंत एक लाख 37 हजार 838 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 3,259 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील 99 आणि ग्रामीण भागातील 209 अशा 308 रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे.