पुढील काळात संघर्षाची तयारी ठेवा; पवारांचे राष्ट्रवादी आमदारांना निर्देश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांनी ४० समर्थक आमदारांसह बंड केल्यानंतर राज्यातील ठाकरे सरकार धोक्यात आले असून राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढील काळात संघर्षाची तयारी ठेवा असे स्पष्ट आदेश आपल्या आमदारांना दिले आहेत. शरद पवारांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कणखर भूमिका घ्यावी, महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्या पाठीशी आहे. पण तुम्ही पुढील काळात कणखर भूमिका घ्यावी असे शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना म्हटले आहे. तसेच राष्ट्रवादीच्या आमदारांनी पुढील काळात संघर्षाची तयारी ठेवावी असे शरद पवारांनी सांगतले

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. आपल्या सोबत ४० पेक्षा जास्त आमदार असून आपला गट हीच खरी शिवसेना आहे असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला. त्यामुळे येत्या २-३ दिवसात राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे