आता मोबाइल फोनवर अधिक खर्च करण्यास रहा तयार, ‘या’ अहवालाने वाढविली युझर्सची चिंता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र । आता तुमच्या मोबाइल फोनचे बिल वाढणार आहे. सोमवारी जाहीर केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, दर वाढीसह अन्य पद्धतींच्या माध्यमातून टेलिकॉम इंडस्ट्री (Telecom Industry) सरासरी रेवेन्यू प्रति यूझर (ARPU – Average Revenue Per User) मध्ये वाढ दिसून येईल. ARPU द्वारे टेलिकॉम कंपन्या दर महिन्याला युझर कडून मिळणाऱ्या कमाईचा मागोवा घेतात. जेएम फायनान्शिअलने ‘A tale of supremacy, defence and survival’ या शीर्षकाच्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, टेलिकॉम इंडस्ट्रीतील एकत्रीकरण जवळजवळ पूर्ण झाले आहे. मात्र, सन 2024-25 मध्ये वायरलेस इंडस्ट्रीची कमाई दुप्पट होईल, असा अंदाज आहे. ARPU मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

या अहवालात म्हटले आहे की, ‘आमची अपेक्षा आहे की वायरलेस इंडस्ट्रीचा रेवेन्यू पुढील आर्थिक वर्ष 2025 पर्यंत 2,600 अब्ज रुपयांपर्यंत पोहोचेल. ARPU मध्ये वाढ होण्याचीही शक्यता आहे, कारण आगामी काळात या इंडस्ट्रीतील गुंतवणूक वाढणार आहे. आर्थिक वर्ष 2025 पर्यंत ARPU सुमारे 230-250 रुपयांपर्यंत वाढू शकेल. या अहवालात असेही म्हटले आहे की VIL ला आर्थिक वर्ष 2023 पर्यंत त्याचा ARPU 190 ते 200 रुपयांपर्यंत वाढवणे आवश्यक आहे.

अहवालात असेही म्हटले आहे की, घराघरांमध्ये फायबर पोचविण्याचे काम आणि एंटरप्राइझ कनेक्टिव्हिटी बिझनेस अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे. येत्या काही दिवसांत ते टेलिकॉम इंडस्ट्रीजसाठी नवीन ग्रोथ इंजिन म्हणून उदयास येऊ शकेल. या अहवालात असेही म्हटले आहे की, ARPU नियामक आणि बाजारपेठेच्या मागणीतून शुल्कवाढीच्या आधारे वाढ अपेक्षित आहे. तसेच कोविड -१९ या काळात डेटाची मागणीही झपाट्याने वाढलेली आहे.

या अहवालात असे म्हटले गेले आहे की नजीकच्या भविष्यासंदर्भात बाजारात होणारी स्पर्धा पाहता या दर वाढीबाबत अनिश्चितता आहे. परंतु नियामक हस्तक्षेप टेलिकॉम इंडस्ट्रीच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी अपेक्षा केली जाऊ शकते. या उद्योगासाठी भांडवली खर्चाचे एक चक्र आता पूर्ण झाले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment