गटाराच्या दुरूस्तीसाठी सूचना देणाऱ्या महिला सदस्यास मारहाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | सैदापूर (ता. सातारा) येथे तुंबलेल्या गटाराच्या सफाईचे काम थांबवण्याच्या कारणावरून महिला ग्रामपंचायत सदस्येला मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलीस गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सैदापूर ग्रामपंचायतीचा सफाई कामगार संजीवकुमार तायाप्पा कट्टेमणी यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. सुधाकर गोविंद थोपटे व जावेद शौकत चावडीवाले (दोघेही रा. सैदापुर, ता. जि. सातारा) या दोघांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 22 रोजी सकाळी 10 च्या सुमारास कट्टेमणी हे सैदापुर येथील काळेवस्ती येथील संजय जाधव यांच्या घरासमोरील तुंबलेले गटाराची दुरुस्तीसाठी जेसीबी घेवून गेले होते. त्याठिकाणी ग्रामपंचायत सदस्या संजीवनी प्रकाश धनवे या कामाबाबत सूचना देत होत्या. यावेळी सुधाकर गोविंद थोपटे व जावेद शौकत चावडीवाले यांनी तेथे येवून आरडाओरडा करुन कट्टेमणी यांना शिवीगाळ व धक्काबुक्की करुन केली. ग्रा. प. सदस्या धनवे यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता, जावेद शौकत चावडीवाले याने धनवे यांना हाताने डाव्या कानाखाली मारहाण केली. सुधाकर गोविंद थोपटे याने धनवे यांना धक्का देवून नाल्यात ढकलण्याचा प्रयत्न केला. यामुळे धनवे यांच्या हातास कोपराला व मनगटाला मुक्कामार लागला आहे.

यावेळी भांडणाचा आवाज ऐकून धनवे यांचे दीर हणमंत जयसिंग धनवे व मुलगा विक्रम प्रकाश धनवे हे मध्ये पडले. तेव्हा त्यांनासुद्धा दोघा संशयितांनी धक्काबुक्की करुन जीवे मारणेची धमकी दिली आहे. तसेच कामगार कट्टेमणी यांनासुद्धा शिवीगाळ करुन जीवे मारणेची धमकी देत सरकारी कामकाज बंद पाडले आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment