पतीला सोडून दुसऱ्या सोबत राहते म्हणून दोघांना मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : पती सोबत न राहता मर्जीने दुसऱ्या व्यक्तीसोबत राहते म्हणून नातेवाईकांनी महिलेला व त्या व्यक्तीला घरी जाऊन लाकडी दांड्याने बेदम मारहाण केल्याचा घटना जोगेश्वरी भागात घडली. या प्रकरणी चार जाणा विरोधात एम.आय.डी.सी.वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारत बनकर (रा.जोगेश्वरी, ता.गंगापूर), सचिन खनडाळे (रा.बदनापूर, जि. जालना) व दोन महिला अशे चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिलेचे लग्न झालेले आहे. घरघुती वादानंतर ती पती सोबत राहत न्हवती. मात्र ती ओळखीच्या अर्जुन देवीसिंग राजपूत (रा.जोगेश्वरी, ता.गंगापूर) सोबत जोगेश्वरी येथे राहत होती.

मात्र तिचे राजपूत सोबत राहणे आरोपिना पसंत नव्हते त्यामुळे गुरुवारी दुपारी सर्व आरोपी हे महिलेच्या घरी गेले. व तेथे वाद घालत महिलेला व राजपूत या दोघांना दांड्याने मारहाण केली. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास साह्ययक फौजदार जगदाळे करीत आहेत.

Leave a Comment