‘विज पुरवठा का खंडित केला’ म्हणत महावितरणच्या अधिकाऱ्यांना मारहाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | विज बिलाच्या वसूलीसाठी गेलेल्या महावितरणच्या अधिका-यांना आमचा विज पुरवठा का खंडित केला म्हणत तिघांनी मारहाण केल्याच्या दोन घटना गुरुवारी दुपारी अंबरहिल आणि माळीवाडा भागात घडल्या. विठ्ठल तुकाराम औताडे (२२, रा. हरिओमनगर), भारत साहेबराव शेजवळ (२८) आणि शरद अनिल लोखंडे (३०, दोघेही रा. माळीवाडा) अशी मारहाण करणा-या तिघांची नावे आहेत.

याविषयी अधिक माहिती अशी की, महावितरण कंपनीचे सहायक अभियंता संतोष गिरजाबा सुर्वे (४३) हे दुपारी थकबाकीदारांकडे वसूलीसाठी गेले होते. सुर्वे हे अंबरहिलकडे जात असताना त्यांच्या पाठीमागून दुचाकीवर आलेल्या औताडे याने आपला विज पुरवठा खंडीत का केला असे म्हणून शिवीगाळ सुरू केली. तसेच सुर्वे यांच्या दुचाकीची चावी काढून घेत त्याने मारहाण केली. याशिवाय विज पुरवठा पुन्हा सुरळीत केल्यावरच दुचाकीची चावी देतो असे म्हणत वाद घातला. त्यामुळे सुर्वे यांनी घटनेची माहिती बेगमपुरा पोलिसांनी कळवत तक्रार दिली.

दुसऱ्या घटनेत वरिष्ठ तंत्रज्ञ राजेंद्र कारभारी वाघमारे (३१) आणि दुर्योधन नारनवरे असे दोघे थकीत विज बिल वसुलीचे कर्तव्य पार पाडत असताना त्यांना भारत शेजवळ आणि शरद लोखंडे यांनी वाघमारे व त्यांचे सहकारी नारनवरे यांना मारहाण करुन धक्काबुक्की केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावरुन दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment