औरंगाबाद | आठ ते दहा जणांच्या टोळीने एका कुटुंबाला मारहाण करीत घराबाहेर हाकलले. जखमी कुटुंबाने पोलिसात धाव घेतली मात्र तो पर्यंत त्या टोळक्याने घरातील मौल्यवान वस्तू , कपडे, टीव्ही असे सुमारे लाखोंचे साहित्य लंपास केल्याची धक्कादायक घटना सातारा ठाणे हद्दीतील कांचनवाडी मध्ये समोर आली आहे.
या धक्कादायक घटने प्रकरणी फिर्यादी जनार्धन विश्वास मावसकर वय-56 (रा.तिरुपती हॅरिझन सोसायटी, कांचनवाडी) यांनी दिलेली माहिती अशी की, गिवर्गिस सक्रिया मॅथु (रा.ज्योतिनगर, औरंगाबाद) कडून मावसकर यांनी घर घेतले होते. ते प्रकरण न्यायालयात आहे. त्यावरून गिवर्गिस 3 महिला व इतर असे 10 जण मावसकर यांच्या राहत्या घरी गेले. तेथे मावसकर त्यांची आणि मुलगा असे तिघांनाही टोळक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत घरातून बाहेर काढले. जखमी अवस्थेत मावसकर कुटुंबाने सातारा पोलीस ठाणे गाठले पोलिसांनी कुटुंबाला एम.एल.सी पत्र देत उपचारासाठी रुग्णालयात पाठवले.
दुसऱ्या दिवशी गिवर्गिस, बबलू पठाडे व इतर 8 असे एकूण 10 आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. उपचार घेऊन मावसकर कुटुंब जेंव्हा घरी पोहोचले तेंव्हा त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली कारण घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त होते. घरातील दोन टीव्ही, कपाट, दोन तोळे सोने, सत्तार हजार रोख, महागड्या साड्या व घरातील भरलेले धान्य लंपास करण्यात आले होते. तर सीसीटीव्ही आणि डिव्हीआर देखील उखडून नेण्यात आले होते. या प्रकरणी तक्रार देण्यासाठी मंगळवारी रात्री मावसकर कुटुंबीयांनी सातारा पोलिस ठाणे गाठले मात्र चोरी गेलेल्या साहित्याची यादी करा सकाळी तक्रार घेऊ असे म्हणत त्यांना परत पाठविण्यात आले असे मावसकर म्हणाले.
आंदोलनाच्या इशाऱ्या नंतर गुन्हा दाखल
रविवारी ही घटना घडल्यानंतर मावसकर कुटुंबीयांनी सातारा ठण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली मात्र सोमवारी देखील गुन्हा दाखल झाला न्हवता त्यानंतर एका संघटनेचे पदाधिकारी यांनी या प्रकरणी पोलिस आयुक्तालयातिल एका वरिष्ठ अधिकारी यांची भेट घेऊन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करा अन्यथा आयुक्तालय समोर आंदोलन करू असा निवेदन द्वारे इशारा दिल्या नंतर वरिष्ठ सूत्रे हलली आणि सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला मात्र या प्रकरणी अजून घरातील लाखोंच्या साहित्य चोरी बाबत गुन्ह दाखल झालेला नव्हता.
तक्रार घेतली, चौकशी सुरू आहे.
या घटनेमध्ये 10 जनावरोधात गुन्हा दाखल आहे.ज्यावेळी गुन्हा दाखल झाला होता त्यावेळी मावसकर कुटुंबियांचे चोरी झाल्याचे काही म्हणणे न्हवते, त्यांनी तक्रार दिली आहे. त्याची चौकशी करण्यात येत आहे.
-सुरेंद्र मळाळे, पोलोस निरीक्षक, सातारा पो.स्टे.