महावितरणाच्या अभियंत्याला मारहाण

औरंगाबाद : कन्स्ट्रक्शन कंपनीला ब्लॅकलिस्ट केल्याच्या आरोप करून २८ मे रोजी महावितरणाच्या अधिक्षक अभियंत्यांना सूतगिरणी चौकातील कार्यालयात मारहाण करण्यात आली.

मोहन शिवाजी काळोगे (49, रा. प्राईड गॅलक्सी अपार्टमेंट, पैठण रोड) असे अधिक्षक अभियंत्यांचे नाव आहे. आरोही कन्स्ट्रक्शन नावाची परमेश्वर मुंढे यांची कंपनी आहे. या कंपनीला महावितरणने ब्लॅकलिस्टमध्ये टाकले आहे.

त्याचा राग आल्याने मुंढे याने महावितरणने आपले दोन लाखांचे नुकसान केले आहे. असे म्हणून काळोगे यांना हातपाय तोडण्याची धमकी दिली. तसेच शिवीगाळ व मारहाण करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्यावरुन जवाहरनगर पोलीस ठाण्यात मुंढे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.