हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Beautiful Hill Stations In Maharashtra) आपला महाराष्ट्र नैसर्गिक सौंदर्याने पूर्णपणे नटलेला आहे. निसर्गाने आपल्याला इतकं भरभरून दिलंय की, घराबाहेर फिरायला जायचं म्हटलं तर राज्यभरात अनेक ठिकाण आहेत. जिथे निवांत वेळ घालवता येईल. पण तरीही फिरायला जायच म्हटलं की, अनेकदा चांगले पर्याय सुचत नाहीत. शिवाय लांब कुठे जायचं म्हटलं तर महिन्याचं बजेट कोलमडणार म्हणून मन मारलं जात. परदेशवारी तर फार लांबच राहिली.
अशावेळी जर तुम्ही निवांत क्षण घालवण्याच्या दृष्टीने कमी बजेटमध्ये चांगले पर्याय शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच. कारण आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील अत्यंत सुंदर अशा ५ सर्वोत्तम हिलस्टेशन्सची माहिती देणार आहोत. जिथे कमी खर्चात मनसोक्त आनंद लुटता येईल. (Beautiful Hill Stations In Maharashtra) आपण आज हिरवा निसर्ग, शुभ्र फेसाळणारे धबधबे, चहुबाजूने डोंगर आणि वन्य जीवन अनुभवता येईल अशा काही बजेट फ्रेंडली ठिकाणांची माहिती घेत आहोत. जिथे जाणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला पुन्हा येऊच नये असं वाटत. चला जाणून घेऊया.
1. माथेरान
माथेरान हे महाराष्ट्रातील सगळ्यात सुंदर आणि लोकप्रिय हिलस्टेशन आहे. सुमारे २ हजार मीटरपेक्षा जास्त उंचीवर वसलेले, निसर्ग सौंदर्यानी नटलेले हे अत्यंत मनमोहक दृश्य दर्शवणारे ठिकाण आहे. (Beautiful Hill Stations In Maharashtra) महाराष्ट्राच्या पश्चिम घाटावरील सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेल्या या ठिकाणाला भेट देण्यासाठी कायम पर्यटक गर्दी करत असतात. विशेषत: पावसाळ्यात या ठिकाणी खूप गर्दी होते. मुंबईपासून हे ठिकाण केवळ १०० किमी अंतरावर असल्यामुळे शनिवार रविवार मुंबईकरांची गर्दी देखील होते. माथेरानपासून आजूबाजूला देखील अनेक लोकेशन्स एक्स्प्लोअर करण्यासारखी आहेत.
2. आंबोली (Beautiful Hill Stations In Maharashtra)
महाराष्ट्रातील आंबोली हे अत्यंत सुंदर आणि शांत ठिकाणांपैकी एक आहे. गोव्याच्या सीमेवर असल्यामूळे या ठिकाणी न केवळ महाराष्ट्र तर गोव्यातूनही पर्यटक येत असतात. खास करून पावसाळ्यात इथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. मित्र मैत्रिणींच्या पिकनिक स्पॉटसोबत हे ठिकाण कपल स्पॉट देखील आहे. महाराष्ट्रातील सर्वात प्रमुख हिल स्टेशनपैकी हे एक आअसून इथला सनसेट पॉईंट फार प्रसिद्ध आहे.
3. माळशेज घाट
महाराष्ट्र राज्यातील सर्वात सुंदर हिल स्टेशन्समध्ये माळशेज घाटाचा समावेश आहे. (Beautiful Hill Stations In Maharashtra) विशेष करून हे ठिकाण निसर्गप्रेमींचे फार लाडके आहे.या ठिकाणी जुलै ते सप्टेंबर दरम्यान गुलाबी फ्लेमिंगो पहायला मिळतात. शिवाय धबधबे, किल्ले अशी काही स्थळे आणखीच आकर्षित करतात. माळशेज घाटाचे सौंदर्य पावसाळ्यात पाहण्याजोगे असते. डोळ्यात साठवून घ्यावे असे हे ठिकाण किमान एकदा तरी एक्स्प्लोअर कराच.
4. भीमाशंकर
महाराष्ट्रातील भीमाशंकर अरण्य साहसप्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठी एक उत्तम ठिकाण आहे. आल्हाददायक निसर्ग सौंदर्याचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी भीमाशंकरचं जंगल, सदाबहार अभयारण्य, हिरवा निसर्ग, भोवतालच्या नद्या अशी अनेक दृश्य इथे पहायला मिळतील. देवस्थान, हिल स्टेशन आणि वन्य प्राणी यांची संपदा असलेलं भीमाशंकर हे अत्यंत सुंदर नैसर्गिक पर्यटनस्थळ असून इथला मनमोहक परिसर तुमच्या डोळ्यांचे पारणे फेडतो.
5. राजमाची
महाराष्ट्रातील कोकण विभागातील सह्याद्री पर्वत रांगेत वसलेले राजमाची हे एक छोटेसे गाव आहे. चारही बाजूंनी हिरवळ आणि ऐतिहासिक किल्ल्यांसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. (Beautiful Hill Stations In Maharashtra) त्यामुळे अनेक ट्रेकर्स इथे आवर्जून येत असतात. त्यामुळे साहसप्रेमींसाठी हे ठिकाण एक उत्तम स्पॉट आहे असे म्हणता येईल.