मित्राला अपार्टमेंटमध्ये येऊ दिले नाही म्हणुन त्याने चक्क सुटकेसमध्ये भरुन मित्राला आणलं घरात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या २० दिवसांपासून देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे प्रत्येकजण घरात बंद आहे. कोणालाही बाहेर पडू दिले जात नाही आहे.अशा परिस्थितीत बर्‍याच अपार्टमेंटमध्ये लोकांना बाहेरून येण्यास पूर्णपणे बंदी घातलीआहे.परंतु असे म्हटले जाते की मैत्रीमध्ये कोणत्याही निर्बंधांची भिंत आडवी येत नाही मेंगलुरुमध्ये एका मित्रावर जीव देणाऱ्या एका मुलाने असे काहीतरी केले जे ऐकून प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभा राहील.

कोरोनाव्हायरसच्या संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे कोणालाही मेंगलुरुमधील अपार्टमेंटमध्ये येऊ दिले जात नाही. अशा परिस्थितीत तेथे राहणार्‍या १७ वर्षाच्या एका मुलाने आपल्या मित्राला अपार्टमेंटमध्ये आणण्यासाठी अनेकदा आरडब्ल्यूएशी बोलणी केली होती.परंतु त्यानंतरही, जेव्हा त्यांनी त्याचे ऐकले नाही, तेव्हा त्याने आपल्या मित्राला चक्क एका सुटकेसमध्ये भरून आणले.

इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने सांगितले की, शनिवारी रात्री अडीचच्या सुमारास हा १७ वर्षीय विद्यार्थी एक मोठा सुटकेस घेऊन स्कूटीवर निघाला. त्यानंतर त्याने आपल्या मित्राला बोलावून सूटकेसमध्ये बसण्यास सांगितले. यानंतर ती सूटकेस स्कूटीमध्ये ठेवून तो पुन्हा अपार्टमेंटमध्ये आला.त्यानंतर तो तेथून सुटकेस ड्रॅग करत असलेला पाहून तेथील गार्डला ते संशयास्पद वाटले आणि त्यांनी आरडब्ल्यूएच्या सदस्यांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस व आरडब्ल्यूएचे सदस्य घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी त्या विद्यार्थ्याला शेवटचा इशारा देऊन सोडले.

त्याचप्रमाणे, गुजरातच्या मोरबी येथे लॉकडॉउनच्या वेळी, एका मित्राने तंबाखूच्या बंदीमुळे अस्वस्थ असलेल्या आपल्या मित्राला मदत करण्यासाठी एक अनोखा मार्ग अवलंबला. मोरबीत सुपारी लावणाऱ्या व्यक्तीने ड्रोनच्या मदतीने मित्राला तंबाखूची सुपारी पाठविली. या लोकांनी त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरलही केला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर दोन्ही तरुणांना अटक करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment