हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। बदलत्या काळात गेल्या काही वर्षांपासून अनेक शेतकरी कुटुंबातील तरुण शेतीपासून दुरावत आहेतच मात्र इतर तरुणही शेतीकडे वळण्यास तयार नाहीत. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान असल्याची मानसिकता निर्माण झाली आहे. कुटुंबापासूनच तरुणांना शेतीसाठी नकार दिला जातो. मात्र आता यामध्ये बदल होतो आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि विविध प्रयोगांमुळे आता शेतीतही अनेक तरुण उतरत आहेत. पुणे जिल्ह्यातील एका तरुणाने अशाच प्रकारे जिद्द आणि कष्टाच्या जोरावर शेतीमध्ये यश मिळवीत ८० एकर शेतीची मालकी मिळविली आहे.
रोहितने आपल्या जिद्दीने आणि कर्तुत्वाने शेती व्यवसायात यश मिळवलं आहे. काही नसललेल्या रोहितकडे जिद्द होती काहीतरी करु दाखवयाची, त्याच्या जोरावर रोहित आज ८० एकराचा बागयतदार आहे.रोहित हा अतिशय सामान्य घरातून येतो. त्याचा लहानपणीचा काळ हा हलाखीत गेला. त्याला त्याचे लहानपण आठवते. लहानपणी शाळेची फी भरायला पैसे नसायचे. त्यामुळे आम्हाला जे आहे त्यातच दिवस काढायची सवय लागली. रोहितने कसेबसे शिक्षण पूर्ण केले. रोहितला पैसे कमवायचे होते. त्याने शेतीचा अभ्यास केला आणि एकंदरीत भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन द्राक्षे लावण्याचा निर्णय घेतला. त्याने शेतीतील आधुनिक तंत्राचा अभ्यास केला. मधल्या काळात त्याने आयात निर्यतीचा अभ्यास केला.
अनेक शेतकऱ्यांना जास्त माहिती नसल्याने आपला माल थेट व्यापाऱ्यांना विकतात. त्यामुळे त्यांच्या मेहनतीचे फळ कमी मिळते. रोहितने या सगळ्यावर मात करत करत द्राक्षे निर्यात केली. त्याने निर्यातक्षम द्राक्षांचा उत्पादनासाठी सगळ्या आंतरराष्ट्रीय मानांकनाचा पालन केले आहे. त्यामुळे निर्यातील कोणत्याही अडचणी आल्या नाहीत. रोहितने आपल्या बॅगेतील द्राक्षे अमेरिकन आणि युरोपियन बाजारात विकून चांगले पैसे मिळवले आहेत. आजमितीला त्याच्याकडे ८० एकर बाग आहे. त्याने त्याच्या पूर्वजांच्या १५ एकर जमीनीवरून सुरुवात केली होतो. त्याच्याकडे १ लाख द्राक्षाचे वेल आहेत. तसेच तो आता आजूबाजूच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतो.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’