Bee Attack : तुमच्यावर मधमाशांचा जीवघेणा हल्ला झाल्यास त्वरित करा ‘हे’ काम, अन्यथा…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bee Attack) अनेकदा एखाद्या झाडावर मधमाशीचे पोळे लागल्याचे दिसून येते. गावाकडे अशा मधमाशीच्या पोळ्यांमधून मध काढले जाते. मात्र शहरात किंवा एखाद्या वस्तीत असे पोळे आढळले तर सगळ्यात आधी नगर पालिका वा पंचायतीत त्याची तक्रार दिली जाते. कारण पोळे तयार करणाऱ्या मधमाशांनी जर चुकून हल्ला केला तर त्यापासून आपला बचाव करणे फार अवघड होऊ शकते. अशावेळी नेमकं काय करायला हवं हे माहित नसेल तर आपण मोठ्या अडचणीत येऊ शकतो. म्हणूनच आज आपण मधमाशांच्या हल्ल्यापासून आपले संरक्षण कसे करता येईल याविषयी काही खास टिप्स जाणून घेणार हॊत.

मधमाशांचं एखाद पोळं पडलं किंवा त्याला धक्का लागल्याने मधमाशा आक्रमक झाल्या तर त्या हल्ला करू शकतात. (Bee Attack) असा अचानक हल्ला झाला तर त्यावेळी आपला बचाव करण्यासाठी काही खबरदारी घ्यावी लागते. अशा परिस्थितीत मधमाशांचा दंश झाल्यास त्वरित काय उपचार करावे याबाबत देखील माहिती घेऊया.

धोक्याची जाणीव होताच त्वरित दूरवर जा

लक्षात घ्या, मधमाशा कधीही आधी आणि थेट हल्ला करत नाहीत. त्यामुळे समजा जर एकामागे एक अशा मधमाशा तुमच्या डोक्यावर घोंगाऊ लागल्या तर त्या हल्ला करणार आहेत समजून जा आणि लगेच तिथून दूरवर निघून जा. (Bee Attack) कारण, एक एक करत काही वेळातच मधमाशांचा मोठा थवा त्या भागी येऊन हल्ला करण्याची शक्यता असते. मुख्य म्हणजे मधमाशा जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांची संख्या शेकडोंनी असते. त्यामुळे ऐनवेळी पळून फायदा होत नाही. म्हणून धोक्याची जाणीव होताच लगेच पळ काढणे फायदेशीर राहील.

कोणतीही वस्तू वा दगड त्यांच्यावर फेकू नका

बरेच लोक मधमाशी जवळ येताच तिला दूर करण्यासाठी तिच्यावर एखादी वस्तू वा दगड फेकून मारतात. तर काही लोक जोरजोरात हात हलवून मधमाशीला दूर करायचा प्रयत्न करतात. (Bee Attack) असे केल्याने मधमाशा त्यांच्या राणी मधमाशीला धोका आहेत असे गृहीत धरतात आणि तिला वाचवण्यासाठी लगेच तुमच्यावर तुटून हल्ला करतात. त्यामुळे एकतर मधमाशांच्या पोळ्यापासून दूर राहा आणि मधमाशी जवळ आली तर तिला मारु नका किंवा त्या जागी अत्तर, सेंट वा धूर करु नका. असे केल्यास मधमाशा आक्रमक होऊ शकतात.

मधमाशांचा हल्ला झालाच तर काय कराल? (Bee Attack)

समजा जर तुमच्यावर मधमाशांनी हल्ला केलाच तर सगळ्यात आधी तुम्ही तुमचा चेहरा कव्हर करा. जेणे करून मधमाशा तुमच्या तोंड, नाक आणि डोळे यांसारख्या नाजूक अवयवांवर हल्ला करून त्यांना हानी पोहचवू शकणार नाहीत. कारण, मधमाशी चावल्यानंतर तो भाग सुजतो आणि काळा देखील पडतो. त्यात आपल्या चेहऱ्यावरील प्रत्येक अवयव हा नाजूक आणि तितकाच संवेदनशील असतो. म्हणून मधमाशांनी हल्ला केला तर सगळ्यात आधी चेहऱ्याचे रक्षण करा.

बऱ्याचदा मधमाशांचा हल्ला झाल्यानंतर लोक त्यांच्या डंखापासून वाचण्यासाठी थेट पाण्यात उड्या घेतात. (Bee Attack) पण यामुळे मधमाशीपासून बचाव होत नाही. उलट अचानक पाण्यात उडी मारल्याने तुम्ही बुडण्याची शक्यता असते. शिवाय मधमाशी चावल्यानंतर पाण्यात उतरल्यास डंख वेळीच न निघाल्याचे आणखी समस्या वाढू शकते. अर्थात पाण्यात उडी मारणे हा काही भरवशाचा पर्याय नाही.

समजा तुम्हाला मधमाशांनी डंख मारला तर तुम्हाला प्रचंड वेदना सहन कराव्या लागतील. कारण, मधमाशीच्या शरीराच्या पाठचा कुसळासारखा काटा तिने एकदा का तुमच्या त्वचेत घुसवला की, प्रचंड असह्य वेदना होतात. या वेदना देणारा हा काटा त्वरित तुमच्या शरीरातून काढून टाकण्याचा प्रयत्न करा. कारण, हा काटा विषारी असू शकतो.

जर तुम्हाला एकावेळी अनेक मधमाशांनी डंख मारले असतील तर कोणतेही घरगुती उपाय करत बसू नका. त्वरित रुग्णालयात जा आणि उपचार घ्या. अन्यथा, ते धोकादायक ठरू शकते. (Bee Attack)