बीड, प्रतिनिधी, नितीन चव्हाण : शेतीच्या जुन्या वादातून शेतातील झोपडीत झोपलेल्या तुकाराम गिरगुणे या शेतकऱ्यावर तिघांनी तलवारीने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तुकाराम गिरगुणे गंभीर जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना बीड जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागात दाखल करण्यात आले आहे.
माजलगाव तालुक्यातील फुलेपिंपळगाव येथील शेतकरी तुकाराम नारायण गिरगुणे (वय 50) हे त्यांच्या शेतातील झोपडीमध्ये झोपले होते. त्यावेळेस गावातील काही व्यक्तींनी तू घेतलेली 8 वर्षा पूर्वी जमीन त्याच भावामध्ये आम्हाला दे म्हणत वारंवार त्रास दिला. तुकाराम यांनी जमीन देण्यास नकार दिला. तुकाराम झोपडीवर एकटेच असल्याची संधी साधून तिघा जणांनी तलवारीने त्यांच्यावर झोपेतच वार केले. यात तुकाराम यांच्या डोक्यावर आणि तोंडावर गंभीर वार असल्याने डॉक्टर यांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागात पुढील उपचार सुरू आहे.
किस्किन साळवे, अरुण साळवे, भीमराव साळवे या तिघांनी रात्री 12 च्या सुमारास हा हल्ला केला असल्याचा आरोप तुकाराम यांच्या भावाने केला आहे.