Wednesday, March 29, 2023

बीड जिल्ह्यातील पांचाळेश्वरमध्ये घराला आग; दीड लाख रुपयांची राख

- Advertisement -

बीड प्रतिनिधी । तालुक्यातील पांचाळेश्वर येथील एका घराला अचानक आग लागून घरातील संसारोपयोगी साहित्य व रोख रक्कम 1 लाख 40 हजार रूपये जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी घडली. या आगीत मोठे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील पांचाळेश्वर येथे देविदास भीमराव शिंदे यांच्या राहत्या घराला मंगळवारी मध्यरात्री अचानक आग लागली. या आगीत शिंदे यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. शिंदे यांनी ट्रॅक्टरचा हप्ता भरण्यासाठी घरात आणून ठेवलेले नगदी 1 लाख 40 हजार रुपये देखील जाळून खाक झाले आहे.

- Advertisement -

या घटनेची माहिती गावकर्‍यांना कळताच गावकर्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने जास्तच पेट घेतल्याने सदर आग आटोक्यात आली नाही. बघता बघता घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. आग कशामुळे लागली, हे मात्र समजु शकले नाही. आगीत शिंदे कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.