हनुमान गडाचे मठाधिपती बुवासाहेब खाडे महाराज यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडच्या हनुमान गडाचे मठाधिपती बुवासाहेब खाडे महाराज (Buasaheb Khade Maharaj) यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. गुन्हा दाखलेल्या महाराजांचं पूर्ण नाव बुवासाहेब जिजाबा खाडे (Buasaheb Khade Maharaj) असे आहे. लग्नाचं आमीष दाखवून त्यांनी लैगिंक अत्याचार केल्याचा आरोप पीडित महिलेकडून करण्यात आला आहे. तिने दिलेल्या तक्रारीवरुन खाडे महाराज (Buasaheb Khade Maharaj) यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून घेण्यात आला असून पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

कोण आहेत खाडे महाराज?
बुवासाहेब जिजाबा खाडे (Buasaheb Khade Maharaj) हे हनुमानगड येथील मठाधिपती म्हणून ओळखले जातात. हनुमानगड हा बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात येतो. जामखेड इथं खाडे महाराज यांचे अनेक भक्तगण असल्याचंही सांगितलं जातं. खाडे महाराज यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानं बीड जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे.

खाडे महाराजांकडूनही तक्रार दाखल
यादरम्यान आपल्याला मारहाण केल्याप्रकरणी आणि लुटल्याप्रकरणी खाडे यांनी (Buasaheb Khade Maharaj) खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सोन्याची चैन, अंगठी, मणी अशी एकूण 13 लाख 60 हजार रुपयांची लूट झाली असल्याचं त्यांनी आपल्या तक्रारीत म्हंटले आहे. या तक्रारीनुसार जामखेड तालुक्यातील मोहरीमध्ये राहणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलीस नेमकी याप्रकरणी कुणावर काय कारवाई करतात, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर

सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक

2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!

संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?