चाकुचा धाक दाखवून घरातील दागिणे लंपास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड, प्रतिनिधी, नितीन चव्हाण :  तालुक्यातील आहेर चिंचोली येथे रविवारी (दि.2) पहाटेच्या सुमारास पाच ते सहा चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश केला. चाकुचा धाक दाखवत अंगावरील सोने व कपाटातील रोख रक्कम असा सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल लपांस केला आहे. दरम्यान घटनास्थळी ग्रामीण पोलीसासंह वरिष्ठांनी भेट दिली. बाळकृष्ण बन्सीधर बहिर यांच्या घरामध्ये पहाटे 4 च्या सुमारास पाच ते सहा चोरट्यांनी प्रवेश केला.

काहीजण घरात घुसले तर एकाने घरातील महिलेच्या गळ्याला चाकु लावला. भीतीपोटी महिलांनी गळ्यातील सर्व दागिणे काडून चोरट्यांना दिले. कपाटातील रोख पाच हजार व सहा तोळे सोने असा सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल घेवून चोरट्यांनी पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि.सुजित बडे, दरोडा प्रतिबंधक पथकाचे सपोनि.गजानन जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि विजय गोसावी, सपोनि.बाळासाहेब आघाव, पोउपनि.सुरेश माळी घटनास्थळी जावून पाहणी केली. यावेळी श्वान पथक व ठसे तज्ञ यांनाही पाचारण करण्यात आले होते. दरम्यान उपविभागीय पोलीस अधीक्षक भास्कर सावंत यांनीही घटनास्थळी भेट देवून प्रकरणाची चौकशी केली.

Leave a Comment