मजुराच्या मुलाचा ह्रदय हेलावून टाकणारा निबंध; बीडची स्नेहसावली संस्था करणार स्वप्न पूर्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड प्रतिनिधी । चौथीच्या एका विद्यार्थ्याचा आपल्या पित्याविषयी लिहिलेला ह्रदय हेलावून टाकणार निबंध काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. ‘माझे पप्पा’ या विषयावर शाळेच्या शिक्षीकेने विद्यार्थ्यांना निबंध लिहायला सांगितला होता. या वेदनांचा कागद समाज माध्यमावर व्हायरल झाला अन् स्नेहसावली या बालघर संस्थेने त्या विद्यार्थ्यासह शाळेतील इतर पाच मुलींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचे संस्थेचे संचालक निलेश मोहिते यांनी सांगितले.

मंगेश परमेश्वर वाळके हा आष्टी तालुक्यातील वाळकेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चौथीचा विद्यार्धी 9 जानेवारी 2020 ला शिक्षिकेने दिलेल्या ‘माझे पप्पा’ या विषयावर निबंध लिहिला. या निबंधातून त्याने आपल्या भावना व्यक्त करून पितृ छत्र हरवल्यानंतर दिव्यांग आईसह त्याची होत असलेली फरपट त्यातून दाखवून दिली. वर्ग शिक्षिका शेख नजमा यांनी तो निबंध वाचला. त्यांच्याही डोळ्यात पाणी आले. मंगेशला मदत मिळावी या हेतूने त्यांनी तो निबंध बारावीच्या वर्गमित्राच्या मदतीने समाज माध्यमावर शेअर केला आणी मंगेशच्या वेदना समाजासमोर आल्या. काही दैनिकांमध्ये बातम्याही छापून आल्या. त्यानंतर मदतीचा ओघ सुरू झाला.

ही माहिती स्नेहसावली बालघरचे संचालक निलेश मोहिते यांना मिळाली. त्यांनी थेट वाळकेवाडी गाठले. आणि वाळके कुटुंबियांची भेट घेतली. मंगेशने निबंधामध्ये मी शिकून मोठा साहेब व्हावा अशी वडीलांनी इच्छा असल्याचा उल्लेख केला होता. मात्र, हे स्वप्न आता स्नेहसावली पूर्ण करणार असल्याचे निलेश मोहिते यांनी सांगितले.

मोहिते म्हणाले, “मंगेश शिकत असलेल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये एकाच कुटुंबातील पाच मुली शिक्षण घेत आहेत. त्यांचीही हालाकीची परिस्थिती असल्याचे समोर आले. मुलींच्या नातेवाईकंची परवानगी घेवून त्यांना शिक्षणासाठी स्नेहसावलीमध्ये पाठवण्याची विनंती केली. घरच्यांनी त्यांना परवानगी दिली. मात्र जिल्हा परिषद शिक्षीका म्हणाल्या की, मुलांची शाळा दीड दोन महिने राहिली आहे. येथील शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर पुढील शिक्षणासाठी तुम्ही स्नेहसावलीमध्ये मुलांना घेवून जा.”

मंगेशने लिहीलेला निबंध : “माझे पप्पा”
माझे नाव मंगेश परमेश्वर वाळके. माझ्या पप्पांचे नाव परमेश्वर वाळके असे होते. माझ्या पप्पाला टिबी हा आजार झाला होता. म्हणून माझ्या मम्मीने माला मामाच्या गावाला पाठविले होते. माझे पप्पा वारले. माझे पप्पा गवंडीच्या हाताखाली काम करायचे. माला खाऊ आणायचे, वही, पेन आणायचे, माझा लाड करत होते. माला माझे पप्पा लई आवडत होते. माझे पप्पा 18 डिसेंबेर ला वारले. माझी मम्मी खूप रडली, मी बी लई रडलो. तेव्हा आमच्या घरी पाव्हणे आले होते. माझे पप्पा खूप मायाळू होते. ते म्हणायचे मंगेश तू शिकून मोठा साहेब हो. पप्पा घरात नसल्यावर कोणीच कोणाला मदत करत नाही. त्यांनी एकदा खोल पाण्यातून मी आमच्या गाईला काढले. मला पप्पांची आठवण येते. रात्रीच्याला आम्हाला चोरांची भीती वाटते, पप्पा तुम्ही लवकर परत या…

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

सुपरस्टार रजनीकांत यांच्याविरुद्ध पोलीस तक्रार दाखल; पेरियार यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळं आले गोत्यात

प्रेमवीर पोलीस कर्मचार्‍याचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न

‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेची १ जूनपासून अंमलबजावणी- केंद्रीय मंत्री रामविलास पासवान

Leave a Comment