हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेव्हा कधी एखाद्या व्यक्तीला पैशाची गरज भासते तेव्हा तो बँकेकडे कर्ज (Loan) घेण्यासाठी अर्ज करतो. मात्र कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करणार्या व्यक्तीला जामीनदार द्यावा लागतो. अनेकदा लोकं मित्र किंवा नातेवाईकांना अडचणीच्या काळात मदत म्हणून कर्जाचे जामीनदार बनतात. मात्र जामीनदार बनणे ही केवळ औपचारिकता नसून ती एक प्रकारची जबाबदारी आहे हे लक्षात घ्या.
जामीनदार व्यक्तीला देखील बँक एक प्रकारे कर्जदाता मानते. जामीनदार राहिल्याने तुमच्याकडून बँकेला ही गॅरेंटी दिली जाते की, जर कर्जदाराने कर्जाची परतफेड (Loan) केली नाही तर बँक तुमच्याकडून कर्ज परत घेऊ शकेल. जर तुम्ही एखाद्यासाठी जामीनदार झालात तर तुमच्यावर देखील काही जबाबदाऱ्या येतात. हे लक्षात घ्या कि, बँका किंवा कोणतीही वित्तीय संस्था कडून जामीनदाराशिवाय कर्ज दिले जात नाही. चला तर मग आज आपण याविषयीची माहिती सविस्तरपणे जाणून घेऊयात …
कर्जाचा जामीनदार म्हणजे काय ???
कर्जाचा जामीनदार त्या व्यक्तीला म्हणतात ज्याच्यावर ही जबाबदारी असते कि, जर कर्जदाराने कर्जाची परतफेड (Loan) केली नाही तर जामीनदार त्या कर्जाची परतफेड करेल. कर्जाचा जामीनदार होण्यासाठी अनेक कागदपत्रांवर स्वाक्षरी करावी लागते. याचा अर्थ असा की, तुम्हाला जामीनदार होण्याचे नियम आणि अर्थ माहित आहे. तसेच तुम्ही नीट विचार करून स्वतःच्या निर्णयाने जामीनदार होत आहात.
होऊ शकेल कायदेशीर कारवाई
बँकेच्या नियमांनुसार कर्जाचा जामीनदार राहणाऱ्या व्यक्तीला देखील कर्जदारच मानते. तसेच कर्ज घेणारी व्यक्ती डिफॉल्टर झाली तर जामीनदारावर देखील कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्याच बरोबर जर कर्जदाराकडून (Loan) योग्य प्रतिसाद मिळाला नाही तर कर्जदाराबरोबरच जामीनदाराला देखील नोटीस पाठवली जाईल.
जामीनदाराची गरज कधी भासते ???
हे लक्षात घ्या कि, बँकेकडून सर्व प्रकारच्या कर्जासाठी जामीनदाराचा आग्रह धरला जात नाही. मात्र, जेव्हा पुरेशी गॅरेंटी नसते आणि बँकेला कर्जाच्या परतफेडीबाबत (Loan) शंका येते तेव्हाच ते जामीनदार आणण्यास सांगतात. तसेच मोठ्या रकमेच्या कर्जासाठी देखील जामीनदार असणे महत्वाचे ठरते.
विमा काढा
जर तुम्ही एखाद्यासाठी कर्जाचे जामीनदार होत असाल तर त्याला आपल्या कर्जाचा विमा काढण्यास सांगा. जर कोणत्याही कारणास्तव कर्जदाराचा मृत्यू झाला किंवा एखादी वाईट घटना घडली तर कर्जाची परतफेड (Loan) करण्याची जबाबदारी विमा कंपनीची असेल. अशा प्रकारे तुम्ही अडचणीत सापडणार नाही.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.rbi.org.in/Scripts/NotificationUser.aspx?Id=12189&Mode=0
हे पण वाचा :
Dhanlaxmi Bank ने FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीन व्याजदर तपासा
Business Idea : वर्षभर मागणी असलेल्या ‘या’ ड्रायफूटची लागवड करून मिळवा करोडो रुपये !!!
Post Office च्या ‘या’ विमा पॉलिसीमध्ये 299 रुपयांमध्ये मिळेल 10 लाखांचे विमा संरक्षण !!
Bank Holidays : सप्टेंबरमध्ये बँका 13 दिवस राहणार बंद, सुट्ट्यांची लिस्ट पहा !!!