सोने खरेदी करण्यापूर्वी, आजचे नवीनदर तपासा, किती महाग किंवा स्वस्त आहे ते जाणून घ्या…!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । आजही सोन्या चांदीच्या किंमती वाढतच आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये आज सकाळी सोन्याच्या दरात तेजी दिसून आली. फेब्रुवारीचा फ्यूचर ट्रेड 192.00 रुपयांनी वाढून 49,726.00 रुपयांवर होता. त्याचबरोबर चांदीच्या बाबतीत मार्चमधील फ्यूचर ट्रेड 482.00 रुपयांच्या वाढीसह 67,472.00 रुपयांच्या पातळीवर होता. आज देशाच्या राजधानीत सोने-चांदीचे दर काय आहेत ते पाहूयात-

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीची स्थिती कशी होती?
आंतरराष्ट्रीय बाजाराबद्दल बोलायचे झाल्यास आजही सोन्यात तेजीत आहे. अमेरिकेतील सोन्याचा भाव प्रति औंस 1,871.56 डॉलरच्या पातळीवर ट्रेड करीत आहे. याशिवाय चांदी 0.03 डॉलरच्या तेजीसह 25.91 डॉलरच्या पातळीवर ट्रेड करीत आहे.

21 जानेवारी 2021 रोजी दिल्लीमध्ये सोन्याचे दर काय आहेत ते तपासा.

> 22 कॅरेट सोनं – 47920 रुपये
> 24 कॅरेट सोनं – 52270 रुपये
> चांदीची किंमत – 67100 रुपये

काल व्यवसाय कोणत्या दराने बंद झाला ते तपासा
बुधवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 347 रुपयांची वाढ झाली. राजधानी दिल्ली मध्ये 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याची नवीन किंमत आता प्रति 10 ग्रॅम 48,758 रुपये झाली आहे.

चांदीची अवस्था कशी होती?
बुधवारी चांदीच्या भावात चांगली उडी नोंदली गेली. दिल्ली बुलियन मार्केटमध्ये चांदीच्या दरात आज प्रति किलो 606 रुपयांची वाढ झाली आहे आणि आता त्याचे दर 65,814 रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत.

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष नवनीत दमानी यांच्या म्हणण्यानुसार आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या किंमती वाढल्यामुळे भारतीय बाजारावरही परिणाम झाला आहे. त्याचबरोबर जगभरातील कोरोना विषाणूबद्दल गुंतवणूकदारांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत ते सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय म्हणून सोन्यात भांडवल गुंतवत आहेत. तसेच सोन्याच्या किंमती सतत चढ-उतार होत असतात. त्याच वेळी, नवीन अमेरिकन सरकार कोरोना संकटाला तोंड देण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची योजना आखत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment