दिवाळीपूर्वी शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे बुडाले 4.80 लाख कोटी रुपये, तज्ज्ञ काय म्हणतात जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्स आज 1158.63 अंकांनी किंवा 1.89 टक्क्यांनी घसरून 59,984.70 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 353.70 अंकांच्या किंवा 1.94 टक्क्यांच्या घसरणीसह 17857.25 च्या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्सची ही गेल्या 20 दिवसांतील नीचांकी पातळी आहे. 8 ऑक्टोबर रोजी तो 60 हजारांच्या पातळीवर गेला. आज बाजाराची मासिक आणि साप्ताहिक एक्सपायरी होती. आज एका दिवसात गुंतवणूकदारांचे सुमारे 4.80 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. BSE ची मार्केट कॅप 260.51 लाख कोटी रुपयांवर आली आहे.

या शेअर्समध्ये मोठी घसरण
यासोबतच बँकिंग शेअर्समध्येही मोठी घसरण झाली आहे. आज, BSE वर ITC च्या शेअर्समध्ये 5.54% ची सर्वात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. याशिवाय आयसीआयसीआय बँक 4.39%, कोटक बँक 4.05%, एक्सिस बँक 3.75%, टायटन 3.68%, एसबीआय 3.42%, एचडीएफसी बँक 3.05%, एनटीपीसी, टेक महिंद्रा, सन फार्मा, बजाज ऑटो यांचे शेअर्स 2 टक्क्यांहून अधिकने घसरण झाली आहे.

या घसरणीचे कारण काय?
मॉर्गन स्टॅन्लेने भारत आणि ब्राझीलच्या शेअर बाजारांना डाउनग्रेड केले आहे. याशिवाय इंडोनेशियाच्या बाजारपेठेला ओवरवेट केले आहे. हा रिपोर्ट समोर आल्यानंतर बाजारात घसरण दिसून येत आहे. मॉर्गन स्टॅन्लेच्या रिपोर्ट नुसार, यूएस फेडरल रिझर्व्हच्या टॅपरिंग प्रोग्राममुळे भारतीय बाजारावर परिणाम होईल.

तज्ञ काय म्हणतात जाणून घ्या
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांच्या मते, आज बाजारात प्रचंड घसरण होण्याची अनेक कारणे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे परकीय गुंतवणुकदारांनी जोरदारपणे शेअर्स विकले. त्याचा परिणाम बाजारावर दिसून येत आहे. याशिवाय आज मॉर्गन स्टॅन्लेने भारताचे रेटिंग कमी केले आहे. त्यामुळे भारतीय बाजारांवर मोठा परिणाम झाला आहे. जागतिक पातळीवरील वाढ आणि महागाई हेही बाजाराच्या घसरणीचे प्रमुख कारण आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा घसरणीमुळे खरेदीच्या नवीन संधी निर्माण होतात.

Leave a Comment