Thursday, March 23, 2023

अन चक्क सचिन पाकिस्तानकडून मैदानात उतरला होता ; जाणून घ्या काय आहे ‘हा’ किस्सा

- Advertisement -

टीम हॅलो महाराष्ट्र । भारताचा मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आज आपला ४७वा वाढदिवस साजरा करत आहे. क्रिकेटच्या या देवावर आज जगभरातून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. १६ वर्षांपासून सुरु झालेले सचिनचे क्रिकेट करिअर मैदानावरील आणि मैदनाबाहेरील अनेक किस्से, संघर्ष कहाण्यांनी भरलेलं आहे. सचिनच्या करिअरमधील याच किश्यांच्या गाठोड्यातून एक किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा किस्सा आहे सचिनच्या पाकिस्तान संघाकडून मैदानात उतरल्याचा. विश्वास नाही न बसत पण खुद्द सचिनने आपलं आत्मचरित्र ‘प्लेइंग इट माय वे’ (Playing It My Way) मध्ये याचा खुलासा केला आहे.

सचिनने १९८९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केले होते. परंतु त्याच्या २ वर्ष आधी म्हणजे १९८७ साली पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. भारत-पाक संघात वनडे आणि कसोटी मालिका होणार होती. जानेवारी आणि फेब्रुवारी १९८७ साली होणाऱ्या या मालिकेआधी एक सराव सामना खेळवण्यात आला. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा वनडे सराव सामना झाला. सचिन तेव्हा फक्त १४ वर्षांचा होता.

- Advertisement -

या सराव सामन्यात पाकिस्तानच्या जावेद मियाँदाद अब्दुल कादिर यांनी लंचनंतर मैदान सोडले. त्यानंतर जेव्हा पाक संघ फिल्डिंगसाठी मैदानात येत होता तेव्हा त्यांनी सचिनला फिल्डिंगसाठी विचारले. सचिनने देखील त्यांना निराश केले नाही आणि फिल्डिंग केली. या सराव सामन्याच्या निमित्ताने का असेना सचिन पाकिस्तानसाठी एका सामन्यात मैदानात उतरला. स्वत:च्या आत्मचरित्रात सचिनने एक बदली खेळाडू म्हणून पाकिस्तानकडून खेळल्याचे सांगितले. अगदी लहान वयात क्रिकेटची बॅट हाता पकडलेल्या सचिनने १९८७च्या वर्ल्ड कप स्पर्धेत बॉल बॉय म्हणून सुद्धा काम केले आहे.

WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews.”