हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयात सकाळी साडेदहा वाजता हि भेट झाली असून दोघांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाल्याने अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. दरम्यान या भेटीपूर्वी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचीही भेट झाल्याचे समोर येत आहे.
फडणवीस आणि पवार यांच्या भेटीत राजकीय चर्चाच झाल्याचं सांगण्यात येत आहे. या भेटीत सहकारावर देखील चर्चा झाली असून साखर कारखान्यांवर होत असलेल्या कारवाईवरही चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं. तसेच राज्यातील राजकीय घडामोडींवरही या भेटीत चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं.
देवेंद्र फडणवीस यांनी देखील आत्ताच अचानकपणे दिल्ली गाठल्यानं राज्यातील राजकारणही वेगळं वळण घेणार का? याकडे अनेकांचं लक्ष आहे. राज्यातील एकूण राजकीय परिस्थिती पाहता दिल्लीतील वाढत्या हालचाली महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.