आयटीआयच्या प्रवेशासाठी अर्ज भरण्यास सुरुवात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद |  महाराष्ट्र शासनाच्या व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संस्था यांच्यावतीने शासकीय खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत म्हणजे आयटीआयची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. तसेच आवडत्या ट्रेड आणि आयटीआयसाठी विकल्प अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे.

राज्यातील 966 आयटीआय मध्ये ऑनलाईन नोंदणी केली जात असून गेल्या आठवड्याभरात 41 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. कोरोनाच्या संसर्गजन्य आजारामुळे सर्व क्षेत्रावर मोठा परिणाम झालेला दिसून येत आहे. शैक्षणिक क्षेत्रात देखील मोठे नुकसान झाले आहे. शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहे.

आता हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने कोरोना नियमाचे पालन करत शैक्षणिक वर्ष चालू करण्याची आणि प्रवेश वर्गाची प्रक्रिया सध्या राबवली जात आहे. इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर या प्रवेश प्रक्रियाला गती आली आहे. राज्यात शासकीय आणि खाजगी असत्या 966 आयटीआय मध्ये प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. या आयटीआय मध्ये एक लाख 36 हजार जागा असून विकल्प भरण्यास सुरुवात झाली आहे.

Leave a Comment