Tuesday, January 31, 2023

बेळगांव लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसच्या सतीश जारकीहोळींची आघाडी; जाणून घ्या निकालाचे ताजे अपडेट

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर लागलेल्या बेळगांव पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. या पोटनिवडणुकीत भाजपने त्यांच्या पत्नी मंगला अंगडी यांना उमेदवारी दिली आहे. तर महाराष्ट्र एकीकरण समितीकडून अवघ्या 26 वर्षांचे शुभम शेळके यांनी उमेदवारी दिली आहे. एकीकडे दिवंगत नेते सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी आणि अवघ्या 26 वर्षीय तरुण नेतृत्व शुभम शेळके यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. जाणून घेऊ या पोटनिवडणुकीचे ताजे अपडेट.

या पोटनिवडणुकीमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी शिवसेना ताकदीनिशी उतरली आहे. तर, भाजपच्या प्रचारासाठीही दिग्गज नेत्यांची फौज मैदानात उतरली आहे. त्यामुळे या निवडणुकीला शिवसेना विरुद्ध भाजप असेही पाहिले जाते. याशिवाय काँग्रेसच्या सतीश जारकीहोळी यांच्यासह 10 जण निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामुळे या पोटनिवडणुकीमध्ये चुरशीचे वातावरण आहे.

- Advertisement -

शेवटचे अपडेट हाती आले तेव्हा 47 व्या राऊंड अखेरीस काँग्रेसचे सतीश जारकीहोळींनी पुन्हा आघाडी घेतली आहे. तर भाजपच्या मंगला अंगडी 9896 मतांनी पिछाडीवर आहेत. सतीश जारकीहोळी यांना 247062, मंगला अंगडी यांना 237116, शुभम शेळके यांना 11771 मते मिळाली आहेत. यासोबतच, बेळगावसह कर्नाटकातील 15 पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत.