Wednesday, February 1, 2023

कौतुकास्पद। स्वित्झर्लंड ते शिमला पायी प्रवास; 18 देशांची पायी यात्रा करून बेन बाबा पोहचले शिमलामध्ये

- Advertisement -

शिमला । लांब केस, शरीरावर केशरी वस्त्र, कमरेला टांगलेली चटई आणि लोटा. असे दिसतात हे 33 वर्षांचे बेन बाबा. बेन बाबा स्वित्झर्लंडहून भारतात आले आहेत. हरिद्वार कुंभात दोन आठवड्यांच्या मुक्कामानंतर बेन बाबा आता शिमला येथे पोहोचले आहेत. भारतीय संस्कृती, सनातन धर्म आणि योग यांनी प्रभावित बेन बाबा पाच वर्षांत सुमारे 6500 किमी प्रवास करून हरिद्वार कुंभचे पवित्र स्नान करून शिमला येथे पोहोचले आहेत. 33 वर्षीय बेन बाबा व्यवसायाने वेब डिझायनर होते, परंतु आता त्यांनी स्वित्झर्लंडचे लक्झरी आयुष्य सोडले आहे आणि ते अध्यात्म आणि योगामध्ये रमले आहे. हिमाचल प्रदेशातील धर्मशालातील मॅकलॉडगंज येथे त्यांनी कायमस्वरूपी तळ बनवला आहे.

बेन बाबा म्हणतात की, युरोपमध्ये पैसा आहे, लक्झरी जीवन आहे, परंतु आनंद नाही. सुख हे योग आणि ध्यान केल्याने येते. त्यांच्याकडे पैसे नाहीत व कोठे राहण्याचा थांगपत्ता देखील नाही. जिथे आपण चालण्यात थकलो, तिथे आपण रात्र घालवतो असे ते म्हणतात. मंदिर, गुरुद्वारा, आश्रमशाळांमध्ये आणि शाळांमध्ये रात्र घालवतात. बर्‍याच वेळा रात्र केवळ उघड्या आकाशाखाली किंवा जंगलामध्ये घालवतात. रस्त्यात जाताना खाण्यासाठी ज्याने जे दिले ते खाऊन पोट भरतात.

- Advertisement -

18 देशांचा प्रवास

18 देशांचा पायी प्रवास करून ते भारतात पोहोचले असल्याचे बेन बाबांनी सांगितले. यावेळी त्यांनी आर्मेनिया, चीन आणि युरोपच्या बर्‍याच देशांमधून प्रवास केला. ते या देशांमधून पासपोर्टद्वारे भारतात पोहोचले आहेत. बेन म्हणाले की, त्यांच्याकडे काहीच नाही व वैरागी वृत्तीमध्ये ते विश्वास ठेवतात. ते योग आणि ध्यान करतात. यामुळे मनाला शांती मिळते. ते अस्खलित हिंदी देखील बोलतात हे आश्चर्यकारक आहे. पुस्तक वाचून त्यांनी हिंदी शिकली आहे असे ते सांगतात.