Benefits Of Boiled Vegetables : निरोगी जगायचंय? तर ‘या’ भाज्या उकडून खा; मिळतील ‘हे’ जबरदस्त फायदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Benefits Of Boiled Vegetables) निरोगी आरोग्य हवे असेल तर तशी जीवनशैली असायला हवी. आता निरोगी जीवनशैली म्हणजे काय? तर आरोग्याशी संबंधित चांगल्या सवयींचे पालन करणे, नियमित व्यायाम करणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला आहार पूर्ण, उत्तम व सकस असायला हवा. पण रोजच्या दगदगीत आणि धावपळीत आपली जीवनशैली कधी बिघडत चालली आहे हे आपल्या लक्षात येत नाही.

सकाळी घाईत नाश्ता टाळणे, वेळेवर न जेवणे, भूक लागली म्हणून अरबट चरबट खाणे यामुळे आपले आरोग्य खराब होते. तळलेले आणि चमचमीत पदार्थ भले आपल्या जिभेचे चोचले पुरवत असतील पण आरोग्याची सोयीने वाट लावतात. (Benefits Of Boiled Vegetables) म्हणूनच आपल्या आहारात काही उकडलेल्या भाज्यांचा समावेश करण्याचा सल्ला आहार तज्ञ देतात. मुख्य म्हणजे, भाज्या उकडून खाल्ल्यास मिळणारे फायदे फारच आश्चर्यकारक आहेत. चला तर याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

उकडलेल्या भाज्या देतात आरोग्यवर्धक फायदे (Benefits Of Boiled Vegetables)

आपल्या आहारात पालेभाज्या, फळभाज्या असायला हव्या. कारण यामुळे आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे मिळत असतात. तसेच काही भाज्या उकडून खाल्ल्याने आरोग्याला मिळणारे फायदे फारच चमत्कारिक असतात. कारण भाज्यांमध्ये असणारे जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर पोषक घटक त्यांच्या उकळण्यानंतरदेखील सुरक्षित राहतात.

तथापि, त्यातील पोषक घटक नष्ट होण्यापासून रोखण्यासाठी आणि ते योग्य प्रमाणात तसेच मर्यादित वेळेसाठीच उकळले गेले तर अधिक फायदेशीर ठरते. याशिवाय उकडलेल्या भाज्यांचे पाणी हे अत्यंत पोषक असते. त्यामुळे ते फेकून न देता त्याचे सेवन करावे. अगदी ग्रेव्ही, सूप किंवा सॉसच्या माध्यमातून देखील या पाण्याचे सेवन करता येते. (Benefits Of Boiled Vegetables) चला तर या आरोग्यदायी भाज्यांविषयी जाणून घेऊया.

पालक

पालेभाज्यांमधील पालक ही भाजी अत्यंत गुणकारी मानली जाते. त्यामुळे विविध पद्धतीचे तिचे सेवन करता येते. भाजी, सूप किंवा अगदी कच्चा पालकदेखील खाणे फायदेशीर ठरते. (Benefits Of Boiled Vegetables) अशी ही गुणकारी पालकाची पाने उकळून घेऊन त्यापासून बनवलेले पदार्थ खाल्ले असता यातील ऑक्सलेटचे प्रमाण कमी होते आणि त्यातील लोह व कॅल्शियम अधिक चांगल्याप्रकारे शरीराला मिळते.

बटाटा (Benefits Of Boiled Vegetables)

बऱ्याच लोकांना बटाटा खूप आवडतो. पण बटाटा खाण्याची योग्य पद्धत वापरली तर तो अधिक लाभदायी ठरतो. बटाटे तळण्याऐवजी उकडून खाल्ले तर त्याचा आरोग्याला चांगला लाभ मिळतो. यातील व्हिटॅमिन सी आणि बी योग्य प्रमाणात शरीराला मिळतात. मुख्य म्हणजे, बटाटा उकडल्याने त्यातील कॅलरीज कमी होतात आणि वजन वाढत नाही.

गाजर

गाजर हे शरीरासाठी अत्यंत चांगले असते. (Benefits Of Boiled Vegetables) खास करून डोळ्यांसाठी गाजराचे सेवन बरेच फलदायी मानले जाते. असे हे गाजर पाण्यात उकळल्याने त्याच्या पेशींच्या भिंती तुटतात आणि यामुळे गजरात बीटा कॅरोटीन शरीरात शोषून घेणे सोपे होते. ज्याचे ग्रहण केले असता शरीरात व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतर होते. याचा शारीरिक आरोग्याला विशेष लाभ होतो.

रताळे

उकडलेले रताळे खाणे फारच आरोग्यदायी मानले जाते. कारण, उकळून झाल्यानंतरदेखील यातील बीटा कॅरोटीन टिकून राहते. जे एक अँटिऑक्सिडेंट आहे आणि हे शरीरात जाऊन व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होते. याचा सर्वाधिक लाभ आपले डोळे, त्वचा आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी होतो. (Benefits Of Boiled Vegetables)