आरोग्यमंत्रा / भारतीय स्वयंपाकघरात सर्व मसाले असतातच, या मसाल्यांचा वापर जेवण रुचकर बनवण्यासाठी केला जातो. त्याचबरोबर अनेक मसाले असेही आहेत जे खाल्ल्याने आपल्या शरीरातील अनेक आजार बरे होण्यास मदत होते. यातीलच एक मसाला म्हणजे दालचिनी. खायला थोडी गोड, थोडी तिखट लागणारी दालचिनी आरोग्यासाठी फारच गुणकारी आहे. दालचिनीचे फायदे पुढील प्रमाणे-
– वजन नियंत्रित राहण्यास दालचिनीचा फायदा होतो.
– दालचिनीमध्ये कॅल्शियम आणि मॅगनीज हे घटक उपलब्ध असल्याने सांधेदुखी पासून अराम मिळतो.
चार थेंब दालचिनीचे तेल नारळाच्या तेलात गरम करून हाडांना लावल्यास दुखण्यापासून अराम
मिळतो.
– दालचिनी मेंदूसाठी देखील लाभदायक आहे. दालचिनीचा सुगंध मेंदूची गती वाढण्यास उपयुक्त आहे.
– दालचिनीमुळे तणाव, चिंता या पासून देखील अराम मिळतो. दालचिनीच्या तेलाचा वास घेतल्याने
स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
– दालचिनीमध्ये अँटी मायक्रोबायल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुण असल्याने याच फायदा सर्दी आणि
खोकला दूर करण्यास होतो.
– दालचिनीमुळे शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. त्याच बरोबर हार्ट अटॅक पासून
वाचण्यास दालचिनी फायदेशीर आहे.
– दालचिनीमुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.
– दालचिनीमुळे तोंडातील दुर्गंध दूर होण्यास मदत होते.
– दालचिनीमुळे पचन क्रिया सुधारते.
– दालचिनीमुळे रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो.
– महिलांना पाळीदरम्यान होणाऱ्या समस्या जसे अधिक रक्तस्त्राव, पोट दुखी या सारख्या समस्यांसाठी
दालचिनी हा उत्तम उपाय आहे.
– पोटात गॅस झाला असल्यास तसेच अपचन झाले असल्यास दालचिनी खाणे फायदेशीर ठरते.
– दालचिनीचा वापर जेवणात केल्यास मधुमेहावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवता येते.
– दात, हाड किंवा पोटात दुखत असल्यास दालचिनी खाल्ल्याने अराम मिळतो.
– दालचिनी त्वचेसाठी देखील फायदेशीर ठरते.
इतर महत्वाचे –
राहुल गांधी यांचा अमेठीमधून उमेदवारी अर्ज दाखल
मतदान केंद्रावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर केला नक्षलवाद्यांनी हल्ला …
‘हे’ उद्योजक माढ्यातून अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढणार …