हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पावसाळ्याला सुरुवात झाली की जास्त आद्रतेमुळे त्वचा चिकट जाणवू लागते. तसेच याचं वातावरणामध्ये त्वचेवर फोड येणे, इन्फेक्शन होणे, अशाही समस्या उद्भवतात. इतकेच नव्हे तर सर्वात जास्त आजार हे पावसाळ्यामध्येच पसरतात. त्यामुळे या काळात स्वतःला निरोगी ठेवणे अत्यंत गरजेचे असते. अशावेळी कडुलिंबाचा (c) वापर करणे अत्यंत फायदेशीर ठरते. कडुलिंब आहारात घेतल्यामुळे त्वचेच्या आणि आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. आज आपण याचं कडुलिंबाचे फायदे जाणून घेणार आहोत.
कडुलिंबाचे होणारे विविध फायदे
- कडुलिंबाची पाने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. कडुलिंबाच्या पानाचे अमोशा पोटी सेवन केल्यामुळे कोणतेही आजार उद्भवू येत नाहीत. तसेच, पोटासंबंधित आजार होत नाहीत. कडुलिंबाच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते.
- पावसाळ्यामध्ये जर सगळ्यात सर्दी खोकल्याचा त्रास जाणवत असेल तर रोज सकाळी कडुनिंबाची पाने चावून खाल्ल्याने चांगला परिणाम दिसून येईल. तसेच यामुळे खोकलाही बरा होईल आणि सर्दी ही निघून जाईल. हे पाने खाल्ल्यामुळे इतर बॅक्टेरियाच्या संसर्गापासून बचाव होतो.
- इतकेच नव्हे तर पावसाळ्यामध्ये चेहऱ्यावर मुरूम , फोड येत असतील तर अंघोळ करताना गरम पाण्यामध्ये कडुलिंबाची पाने टाकावीत. कडुलिंबाच्या पाण्याने अंघोळ केल्यामुळे त्वचेसंबंधित कोणत्याही समस्या उद्भवणार नाहीत.
- कडुलिंबाचे पाणी पिणे देखील शरीरासाठी या काळात अत्यंत चांगले ठरते. यामुळे इतर कोणतेही घातक आजार होत नाहीत. कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे ही पाने खाल्ल्याने शरीरावर चांगला परिणाम होतो.
पानांचे सेवन कसे करावे??
रोज सकाळी कडुलिंबाची 4-5 ताजी पाने धुवून घ्या. यानंतर उपाशीपोटी ती पाणी चघळा. तसेच याऐवजी तुम्ही कडू लिंबाच्या पानांचा रसही पिऊ शकता.