हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल Credit Card वापरणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळते आहे. तेच जवळपास सर्वच बँकांकडून ग्राहकांसाठी आकर्षक ऑफरही दिल्या जात आहेत. मात्र, अशीही काही लोकं आहेत ज्यांच्याकडून क्रेडिट कार्डचा वापर करणे टाळला जाते. मात्र हे लक्षात घ्या कि, जर योग्य पद्धतीने वापर केला तर त्याचे अनेक फायदे देखील आहेत. कारण क्रेडिट कार्डद्वारे आपल्याला अनेक ऑफर आणि सवलती मिळू शकतील. आज आपण क्रेडिट कार्डचा वापर कसा करावा आणि Credit Card द्वारे फायदा मिळवावा याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत.
Credit Card चे फायदे
क्रेडिट कार्डचा सर्वात मोठा फायदा असा कि, याद्वारे आपण जेव्हा खरेदी करतो तेव्हा पेमेंट करण्यासाठी आपल्याला वाढीव कालावधी मिळतो. या कालावधीसाठी बँकेकडून व्याज आकारले जात नाही. तसेच हा वाढीव कालावधी प्रत्येक बँकेकनुसार 55 दिवसांपर्यंत असू शकेल. यामुळे जर कधी आपल्याला अचानक पैशांची गरज भासली तर क्रेडिट कार्डद्वारे ती भागवता येईल. तसेच वाढीव कालावधी संपण्यापूर्वी बँकेला पैसे परत करता येतील.
सहजपणे कर्ज मिळू शकेल
जर Credit Card चा योग्य वापर केला तर याद्वारे आपला चांगला क्रेडिट स्कोअर तयार होऊ शकेल. आजकाल जवळपास सर्वच बँकांकडून कर्ज देण्याआधी ग्राहकांचा क्रेडिट स्कोअर तपासला जातो. तसेच चांगला क्रेडिट स्कोअर असेल कर्ज मिळवणे देखील सोपे होईल. त्यामुळे आपला क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी क्रेडिट कार्ड हा एक चांगला पर्याय ठरेल. याशिवाय जर कधी आपल्याला तातडीने पैशांची गरज पडली तर क्रेडिट कार्डधारकांना प्री-अप्रुव्हड लोन देखील सहज मिळू शकते.
ईएमआयची सुविधा
Credit Card द्वारे खरेदीवर आपल्याला ईएमआयची सुविधा देखील मिळते. यामध्ये EMI दोन प्रकार असतात. ज्यामध्ये पहिला आहे नो-कॉस्ट ईएमआय, जो 3 ते 9 महिन्यांपर्यंत असतो. यामध्ये आपल्याला व्याज द्यावे लागत नाही. तसेच दुसऱ्या प्रकारामध्ये व्याजासह ईएमआय असेल. जो सहसा एका वर्षापेक्षा जास्त असतो. यामध्ये कमी व्याजासह EMI सुविधा मिळते. अशा प्रकारे योग्य वापर करून क्रेडिट कार्डद्वारे चांगला फायदा मिळवता येईल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bankbazaar.com/credit-card.html
हे पण वाचा :
FD Rate : ‘ही’ हाउसिंग फायनान्स कंपनी FD वर देते आहे 7.50% पेक्षा जास्त व्याज
Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात साप्तहिकरीत्या वाढ, गेले आठवडाभर सराफा बाजाराची स्थिती कशी होती ते जाणून घ्या
Multibagger Stock : गेल्या काही वर्षांत 200% जास्त रिटर्न देऊन ‘या’ शेअर्सने गुंतवणूदारांना केले मालामाल !!!
‘या’ 5 Multibagger Stocks ने गुंतवणूकदारांना अल्पावधीतच मिळवून दिला मोठा नफा
Bank FD : ‘या’ 102 वर्ष जुन्या बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याज दर तपासा