आरोग्यासाठी आवळा आहे खूप गुणकारी ; जाणून घेऊ आवळ्याचे जबरदस्त फायदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आवळा हा अनेक जणांना खायला आवडत नाही. कारण तो चवीने हा फार तुरट असतो. पण तुम्ही जर एकदा आवळा खाल्ला आणि त्यानंतर पाणी पिले तर मात्र तुमच्या जिभेवरची चव जाणार नाही. कारण त्यानंतर पाणी पिल्याने तुरट चव हि एकदम गोड लागायला सुरुवात होते.आवळा सरबत घेतल्याने आपल्याला अनेक फायदे होतात. लहान मुलांना सुद्धा आवळा देणे किंवा त्याची कॅण्डी तयार करून देणे फायदेशीर राहणार आहे. त्यामुळे मुलं असा आवळा खाणे पसंत करत नाहीत तर कोणत्या ना कोणत्या माध्यमातून त्यांना ते देणे फायदेशीर ठरणार आहे.

आवळ्याचे काय आहेत फायदे [benefits of amla] –

–आपले आरोग्य चांगले राहते.

–आयुष्य वाढण्यास मदत होते. आयुर्वेदातही आवळ्याला अधिक महत्व देण्यात आले आहे.

— आवळा सरबतात मध मिसळले तर अधिक चांगले. तसेच आवळा ज्यूसमुळे महिलांची पाळीची समस्या दूर होण्यास मदत होते

–आवळा सरबत घेतल्याने सतत तोंड येत असेल तर ही समस्या दूर होते.

–आवळा सरबत प्यायल्याने चेहऱ्याला ग्लो येतो. तसेच त्वचा रोग दूर होण्यास मदत होते.

–लघवीचा ज्यांना त्रास आहे. त्यांच्यासाठी आवळा सरबत चांगले.

—आवळा सरबत नियमित घेतल्यास कोलेस्ट्रॉल कमी होते. त्यामुळे हृदयरोगाचा धोका टळण्यास मदत होते.

—आवळा खाण्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. कारण मेटाबॉलिज्म व्यवस्थित होऊन वजन कमी होते.

–आवळा हा पाचक आहे. त्यामुळे पचन व्यवस्था व्यवस्थित राहते.

–आवळा ज्यूस आणि मध एकत्र करुन प्यायल्याने दम्याचा प्रभाव कमी होतो.

–रक्त शुद्ध करण्यासाठी आवळा सरबत आणि मध खूप गुणकारी आहे.

–ज्यांना किडनी स्टोनचा आजार आहे. त्यांच्यासाठी आवळा सरबत चांगले. मुतखड्याचा आजार दूर होण्यास मदत होते.

–आवळ्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment