बीट खा निरोगी राहा ; जाणून घेऊया बीट खाण्याचे आरोग्यदायी फायदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बाजारात सहज उपलब्ध होणारे आणि सामन्यांना परवडणारे सलाड यामध्ये बीटाचा समावेश होतो. बऱ्याच वेळा सलाड खाताना त्यात काकडी,गाजर यांच्यासोबतच बीटही दिले जाते. मात्र बीट पाहून नाके मुरडणारे अनेक जण आहेत. त्यांना बीटाचे फायदे माहित नसतात. तर अशा सर्वांसाठी बीट खाण्याचे फायदे जाणून घेवूयात.

एखाद्या पदार्थाला नैसर्गिक लाल रंग आणायचा असेल तर त्यामध्ये बीटाचा वापर केला जातो. बीटामुळे पदार्थाला अत्यंत सुंदर रंग येतो. त्याचप्रमाणे अनेक गृहिणी बीटापासून वेगवेगळे पदार्थदेखील करत असतात. यामध्ये बीटाचा हलवा, बीटाची कोशिंबीर, बीटाची बर्फी असे अनेक पदार्थ आहेत. विशेष म्हणजे नावडतीचं हे बीट अत्यंत पौष्टिक असून ते खाण्याचे काही गुणकारी फायदे आहेत.

घशात जळजळ होत असल्यास बीटाचा रस घेण्याचा सल्ला दिला जातो. बीट खाल्ल्यामुळे आम्लपित्त, पित्त होणे या समस्या दूर होतात. बीट खाल्ल्याने पोट साफ होते आणि बद्धकोष्ठता तसेच मूळव्याधीच्या समस्येवरही आराम मिळतो. तसेच रसक्षयावर आराम मिळतो, थकवा दूर होतो, हातापायांमध्ये ताकद येते, वजन कमी होते, दिर्घकाळचा पांडू विकार बरा होतो, बीटामुळे शरीरातील ताकद वाढते. आपल्या रोजच्या आहारात बीटाचा समावेश केल्यास नक्कीच फायदा होवू शकतो. मात्र याचा विशिष्ट गोष्टीसाठी उपयोग करत असताना वैद्यकीय सल्ला नक्की घेतला पाहिजे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment