Benefits Of Eating Crab : पावसाळ्यात खेकडे खाल्ल्याने मिटेल संसर्गांची चिंता; मस्त खा, स्वस्थ रहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Benefits Of Eating Crab) राज्यभरात पावसाळा सुरु झाला आहे. पाऊस म्हटलं की, सगळ्यात पहिलं डोळ्यासमोर उभं राहतं ते गरमगरम वाफाळलेला चहा आणि भजीचं दृश्य, कल्पनेत इतकं भारी वाटत असेल तर हे वास्तव किती कमाल असेल यात काही शंकाच नाही. असे बरेच पदार्थ आहेत जे पावसाळ्यात खाण्याची मजा काही औरच!! पाऊस पडू लागला की, आपोआप झणझणीत, चमचमीत पदार्थ खायची ईच्छा होते. पण बऱ्याचवेळा पावसाळ्यात येणारं आजारपण जिभेचे चोचले पुरवायला नकार देतं.

पावसाळी आजारपणात ताप, सर्दी, खोकला आणि कफ हे सर्वसामान्य आजार मानले जातात. अशा संसर्गजन्य आजारांमूळे रोग प्रतिकार शक्ती कमी होते. शिवाय तोंडाची चव जाते. मुडदेखील खराब होतो. अशावेळी आपल्या आहारात खेकड्यांच्या समावेश करावा. (Benefits Of Eating Crab) एकतर खेकडा चवीला कमाल असतो आणि दुसरं म्हणजे खेकड्यामध्ये असे बरेच औषधी गुणधर्म आहेत जे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत लाभदायी मानले जातात. मुख्य म्हणजे, पावसाळ्यात खेकडे खाल्ल्याने आजारपणसुद्धा दूर राहतं आणि त्यामुळे पाऊस मनसोक्त एन्जॉय करता येतो. चला तर पावसाळ्यात खेकडे खाण्याचे फायदे जाणून घेऊया.

1) रोग प्रतिकार शक्तीत वाढ (Benefits Of Eating Crab)

खेकडा हा अत्यंत लोकप्रिय सी फूडचा प्रकार आहे. जो आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी आहे. उत्तम आरोग्य आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खेकड्याचा रस्सा पिण्याचा सल्ला दिला जातो. शिवाय खेकड्याचे मांस खाल्ल्यामुळे शारीरिक ऊर्जा मिळते आणि रोग प्रतिकारशक्तीतसुद्धा वाढ होते. खेकड्याला एनर्जी बूस्टर म्हणता येईल.

2) कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण

खेकडे हा सी फूडचा असा प्रकार आहे जो विशेषतः पावसाळ्यात खाल्ला जातो. खेकडा खाणे आरोग्यासाठी खूप लाभदायी असे. खास करून हृदयासाठी खेकड्याचे सेवन खूप फायदेशीर ठरतो. (Benefits Of Eating Crab) कारण, खेकड्याचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. परिणामी, हृदयाचे आरोग्य राखले जाते.

3) मजबूत हाडं

स्नायूंमध्ये वेदना, हाडांमध्ये ठिसूळपणा अशा समस्या उद्भवल्यास आहारात खेकड्याचे सेवन जरूर करावे. कारण खेकड्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते. (Benefits Of Eating Crab) ज्याचा फायदा हाडांच्या मजबूतीसाठी होतो. खेकडे खाल्ल्याने हाडं नुसती मजबूत होत नाहीत तर कमकुवत होण्यापासून त्यांचे रक्षण होते.

4) त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर

खेकडा हा सी फूडचा प्रकार आहे. त्यामुळे यातील फिश ऑईल आणि ओमेगा हे आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी अत्यंत लाभदायी ठरते. (Benefits Of Eating Crab) खेकड्यांमध्ये या दोन्ही घटकांचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे केस मजबूत आणि त्वचा चमकदार होण्यास मदत मिळते.

5) तोंडाला चव येते

आजारपणात बऱ्याचवेळा तोंड कडू होते. जेवणावरून मन उडते. (Benefits Of Eating Crab) काहीच खावे वाटत नाही. अशावेळी खेकड्याचे मांस खाल्ल्यामुळे तोंडाला चव येते. त्यामुळे पावसाळी आजारपणात आवर्जून खेकडा खाण्याचा सल्ला दिला जातो.