Benefits Of Eating Fish : तुम्ही मासे खात नाही? ‘हे’ आश्चर्यकारक फायदे जाणून घेतल्यावर रोज खाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Benefits Of Eating Fish) ताजा ताजा म्हावरा.. जरा जीव आवरा.. पापलेट, कोळंबी, तिसऱ्या, बोंबील नुसतं नाव ऐकूनच तुमच्या कल्पनेतील घोडदौड सुरु झाली असेल. कधी समोर थाळी येते आणि आपण त्यावर उभा आडवा हात मारतो असे झाले असेल ना!! नॉनव्हेज लव्हर मंडळींसाठी मासे म्हणजे सुख. नुसत्या वासाने त्यांच्या तोंडाला पाणी सुटतं आणि जर थाळीत मच्छी आली तर काय सुट्टीच नाही. कोकणी लोकांसाठी तर मासे अगदी वीक पॉईंट. माशाचं कालवण, रस्सा, फिश फ्राय अहाहा!! नुसती चंगळचं!! पण बऱ्याच लोकांना मासे खायला आवडत नाहीत. अशा लोकांसाठी आजची ही स्पेशल बातमी. कारण अनेक आरोग्यदायी फायद्यांसाठी मासे खाण्याचा सल्ला तज्ञ मंडळी देतात. त्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत.

आरोग्यदायी गुणधर्म

मासे चावी जितके उत्तम आणि स्वादिष्ट असतात तितकेच ते आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. कारण माशांमध्ये अनेक पोषक तत्वे असतात. जी आपल्या शरीराला गरजेची आहेत. (Benefits Of Eating Fish) यातील अनेक आवश्यक असलेले पोषक तत्वे विविध आजरांशी सामना करण्याचे बळ देतात. मासे खाल्ल्याने आपल्या शरीराला आपोआप ओमेगा- 3, फॅटी अॅसिड यांसारखे आवश्यक पोषक घटक मिळतात. ज्यामुळे कर्करोग आणि हृदयविकारासारख्या आजारांवर मात करता येते. चला तर मासे खाण्याचे फायदे जाणून घेऊ.

नैराश्यावर मात

अनेक लोकांची सतत चिडचिड होते. हे लोक कायम कुठल्यातरी तणावात असतात. (Benefits Of Eating Fish) त्यामुळे मूड खराब असणे, सतत नाराज असणे अशा परिस्थिती दिसून येतात. अशा लोकांना आपल्या आहारात आठवड्यातून एकदा तरी मासे खावे. कारण माशांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड असते. जे मेंदूतील inflammation कमी करते आणि नैराश्यावर मात करणे सोपे होते. मग आपोआप मूड फ्रेश राहतो.

ब्रेन स्ट्रोकचा धोका टळतो (Benefits Of Eating Fish)

जे लोक आठवड्यातून किमान एकदा तरी मासे खातात त्यांना मेंदूच्या आजरांचा धोका नसतो. कारण माशांमध्ये ओमेगा- ३ पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असते जे मेंदूच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका टळतो.

मजबूत हाडे

माशांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असते. त्यामुळे आपल्या शरीरातील हाडं तसेच दातांच्या मजबुतीसाठी आठवड्यातून किमान २ वेळा तरी मासे खाण्याचा सल्ला तज्ञ देतात.

कॅन्सरचा धोका टळेल

आठव्यातून दोन ते तीन वेळा मासे खाल्ल्याने प्रोस्टेट कॅन्सर आणि कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका कमी होतो, असे काही तज्ञांच्या संशोधनात दिसून आले आहे. (Benefits Of Eating Fish) त्यामुळे नियमितपणे मासे खाणे देखील आरोग्यदायी ठरेल असे म्हटले जाते.

नजरेसाठी फायदेशीर

आजकाल लवकर चष्मा लागणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पण जर तुमच्या आहारात मासे असतील तर यातील ओमेगा 3 फॅटी अॅसिड डोळ्यांसंबधित आजार दूर ठेवण्यास मदत करतात. तसेच माशांमध्ये आढळणारे आल्मा तुमची नजर वाढवू शकतात.

अनिद्रेचा त्रास होईल दूर

अनेकांना कमी झोप किंवा अनिद्रेचा त्रास असतो. (Benefits Of Eating Fish) अशा लोकांना आपल्या आहारात माशांचे सेवन करावे. माशांमध्ये असणारे व्हिटॅमिन डीचे नियमित सेवन केल्यास निद्रानाशाची समस्या आटोक्यात येते. यामुळे चांगली झोप लागते आणि अनिद्रेचा त्रास दूर होतो.

पक्षाघाताचा धोका टळतो

माशांचे सेवन केल्यास रक्त वाहिन्यांसंबधी मेंदूंचे नुकसान होण्याची जोखीम मोठ्या प्रमाणात कमी होते, असे काही तज्ञांच्या अभ्यासातून समोर आले आहे. त्यामुळे पक्षाघाताचा धोकादेखील होते, असे त्यांचे म्हणणे आहे. (Benefits Of Eating Fish)