कडुलिंबाचे फायदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आरोग्यमंत्रा /  मराठी वर्षाची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुडीपाडवा या दिवशी गुढी उभी करताना कडूलिंबाच्या झाडाची डहाळी वापरतात. आपल्यातील आजारांचे प्रमाण कमी व्हावे आणि आपली प्रतिकारशक्ती वाढावी, म्हणून आपल्या पूर्वजांनी पाडव्याला कडुनिंबाचे सेवन करण्यास सांगितले आहे.कडुलिंबाचा वृक्ष सगळ्या दृष्टीने औषधी आहे.कडुलिंबाचा उपयोग अनेक आजारांवर होते.

कडुलिंबाचे फायदे –
– कडुलिंबाची पाने, काड्या वाटून त्याचा रस पिल्याने उन्हाळ्यात उन्हाचा त्रास होत नाही.
– कडुलिंबाच्या काडीने दात घासल्याने दात किडत नाहीत तसेच दाताना बळकटी येते.
– कडुलिंबाच्या पानांचा रस पिल्याने मुळव्याध व पोटातील कृमींवर मारण्यास याचा उपयोग होतो.
– कडुलिंबाची वाळलेली पाने धान्यात घातल्याने धान्याला कीड किंवा अळी लागत नाही.
– स्त्रियांना प्रसूतीनंतर तीन दिवस जेवणाच्या आधी कडुलिंबाच्या पानांचा रस दिल्याने मातेला दूधही जास्त
येत.
– कडुलिंबाचे तेल सांधेदुखी कमी होण्यासाठी फायदेशीर आहे.
– रोज अर्धा कप कडुलिंबाचा रस प्यायल्याने मधुमेह नियंत्रित करता येतो.
– कडुलिंबाची झाडे जिथे जास्त प्रमाणात असतात तेथील हवा शुद्ध राहते.
– अंगाला खाज सुटत असेल तर पानाचा रस सर्व अंगाला किंवा आंघोळीच्या गरम पाण्यात दहा -बारा
कडुलिंबाची पान ठेचून घातल्याने खाज कमी होण्यास मदत होते.
– पोटात जंत झाले तर पानांचा रस काढून एक चमचा रसात थोडा गूळ घालून तीन दिवस प्याल्यास जंत
बाहेर पडतात.
– कडुलिंब या झाडाची पाने खोबरेल तेलात काळी होईपर्यंत उकळायची आणि ते तेल नियमितपणे
लावल्याने केसांची वाढ जोमाने होते.
– ताप आल्यास सकाळ-संध्याकाळ कडुलिंबाच्या सालीच्या काढा घ्यावा.
– कडुलिंबाची पान जखमेवर कुटून लावल्यास जखम लवकर बरी होते.
– त्वचेवर डाग पडल्यास कडुलिंबाचे तेल लावावे
– कडुलिंबाबाच्या पानांची पूड शेतात पसरल्यास खत म्हणून उपयॊगी तर पडतेच पण त्यापेक्षाही रोपांना
किडीपासून दूर ठेवते.
– साबण, सौंदर्य प्रसाधने यात तसेच दंतमंजन, पेस्ट यामध्ये पण कडुलिंबाचा वापर करतात.

कडुलिंब अनेक आजारांवर उपायकारक असल्याने कडुलिंबाला बहुगुणी मानले जाते. त्यामुळे कडुलिंबाचा वापर करणे गरजेचे आहे.गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी याची कोवळी पाने, फुले, लहान कोवळी फळे, जिरे , मिरे ,सैन्धव मीठ, ओवा, गूळ, हिंग, चिंच हे सर्व एकत्र वाटून त्याची गोळी करून खातात.

 

इतर महत्वाचे –

सातारच्या पोलीस हवालदाराची मुलगी झाली IAS, देशात १०८ वा क्रमांक

महाराष्ट्राची सृष्टी देशमुख यूपीएससी परीक्षेत देशात पहिली

जिल्ह्याचा विकास पाहून सुनील मेंढे यांना निवडून द्या – चंद्रशेखर बावनकुळे 

Leave a Comment