Benefits Of Surya Namskar | दररोज Surya Namaskar केल्यामुळे हृदयासह मन ही राहील निरोगी; वाचा इतरही फायदे

Benefits Of Surya Namskar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Benefits Of Surya Namskar | आजकालच्या या धकाधकीच्या आयुष्यामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. अशावेळी लोक जिमला जातात किंवा व्यायाम करतात. परंतु प्राचीन काळापासून योग साधनेला खूप महत्त्व आहे. आणि ते महत्त्व देखील संपूर्ण जगाला पटलेले आहे. योगासनांमध्ये अनेक आसनांचा समावेश होतो. ज्यामुळे आपल्याला खूप फायदा होतो. त्यातीलच एक महत्त्वाचे आसन म्हणजे सूर्यनमस्कार योगा.

सूर्यनमस्कार हे योग साधनेतील एक खूप महत्त्वपूर्ण आसन आहे. सूर्यनमस्कार हा 12 शक्तिशाली योग आसनांचा संच आहे. याचा जर तुम्ही नियमितपणे सराव केला, तर तुमच्या आरोग्याला खूप फायदे मिळतील. दररोज जर सूर्यनमस्कार केले, तर तुम्हाला शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य मिळेल. त्याचप्रमाणे शरीरावर उत्तम नियंत्रण मिळवता येईल. मनाची शांतता मिळेल त्याचप्रमाणे संतुलित ऊर्जा देखील निर्माण होईल.

सूर्यनमस्कारामुळे शारीरिक दृष्ट्या होणारे फायदे | Benefits Of Surya Namskar

वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय

बॉडी फॅट आणि कॅलरी बर्न करण्यासाठी सूर्यनमस्कार हा सगळ्यात उत्तम उपाय आहे. जितका वेळ तुम्ही न थांबता हे आसन कराल, तितक्या जलद गतीने तुमचे फॅट आणि कॅलरी बर्न होतील. सूर्यनमस्कारच्या12 आसनांचा एक सेट करण्यासाठी एक मिनिट लागू शकतो. या वेळेत जवळपास 13 ते 14 कॅलरीज तुम्ही बर्न करू शकता.

लवचिकता प्राप्त होते

सूर्यनमस्काराच्या नियमित सरावामुळे स्नायू आणि जॉइंट्सवर ताण निर्माण होतो. यामुळे शरीरात लवचिकता प्राप्त होते.

पचनक्रिया सुधारते | Benefits Of Surya Namskar

सूर्यनमस्कार प्रचंड क्रिया सुरळीत करण्यासाठी सर्वोत्तम ठरते. तसेच कमी ब्लडप्रेशर सर्क्युलेशनमधील सुधारते हृदयविकाराचा धोका देखील सूर्यनमस्कार केल्याने कमी होतात.

एकाग्रता वाढण्यास मदत

सूर्यनमस्कार करताना ध्यान आणि एकाग्रता खूप महत्त्वाची आहे. तुम्ही जर या आसनाचा नियमितपणे सराव केला, तर तुमच्या मनाची एकाग्रता वाढण्यासाठी तसेच स्मरणशक्ती सुधारण्यासाठी देखील फायदा होतो.

मूड उत्तम राहतो

सूर्यनमस्काराच्या रोजच्या सेवनामुळे इंडोर्फिन हार्मोनला चालना मिळते. त्यामुळे तुमचा मूड चांगला राहतो आणि डिप्रेशन देखील कमी येते.