‘या’ राज्यात कोरोनाचा मृत्यूदर सर्वाधिक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोलकाता । देशात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची सख्या वाढत आहे. असे असले तरी मृत्यूचा दर काही प्रमाणात कमी होत आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक असून या राज्यातील मृत्यूचा दर देशातील अन्य राज्याच्या तुलनेत सर्वाधिक आहे. पश्चिम बंगाल राज्यात मृत्यूदर १२.८ टक्के इतका नोंदवला गेला आहे. केंद्र सरकारची केंद्रीय आंतरमंत्रालयीन पथकाच्या हे निदर्शनास आले असून तसे पथकाचे प्रमुख अपूर्व चंद्रा यांनी पश्चिम बंगालचे प्रधान सचिव राजीव सिन्हा यांना दिल्लीला निघण्यापूर्वी पत्राद्वारे कळवले आहे.

पश्चिम बंगाल राज्यात कोरोनाच्या मृत्यूचा दर इतर राज्यांच्या तुलनेत देशात सर्वाधिक आहे. यामागचं मुख्य कारण म्हणजे अतिशय कमी चाचण्या घेणे, दक्षता न बाळगणे आणि योग्य प्रकारे ट्रॅकिंग न ठेवण्याचा परिणाम असल्याचे चंद्रा यांनी म्हटले आहे. पश्चिम बंगाल राज्य सरकारने आपल्या वैद्यकीय बुलेटिनमध्ये नमूद केलेल्या कोविड-१९ ची लागण झालेल्यांची संख्या आणि केंद्र सरकारशी त्या संख्येबाबत दिलेल्या माहितीत विसंगती विसंगती समोर आली असल्याचे चंद्रा यांनी पत्रात नमूद केले आहे. चंद्रा यांच्या नेतृत्वात हे पथक शहरात दोन आठवडे मुक्काम करून पुन्हा राजधानीत परतले.

दरम्यान, आज केंद्रीय आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात २५५३ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यासोबत देशातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ४२,५३३ वर पोहचली आहे. परंतु, दिलासादायक म्हणजे देशात करोनावर मात करणाऱ्या रुग्णांचा आकडाही तेजीनं वाढताना दिसून येतो आहे. गेल्या २४ तासांत १०७४ रुग्ण करोनामुक्त झाल्याचं समजतं आहे. त्यामुळे, आत्तापर्यंत करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ११,७०६ झालीय. जवळपास २७.५ टक्के लोकांनी करोनावर मात केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment