हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बंगळुरुतील किक-बॉक्सिंग मॅचदरम्यान एक मोठा अपघात घडला आहे. एका किक बॉक्सरचा बॉक्सिंग रिंगमध्ये गंभीर मार लागल्याने बंगळुरुतील एका रुग्णालयात मृत्यू झाला. गुरुवारी या घटनेबाबत माहिती मिळाली. बॉक्सरचं नाव निखिल सुरेश असून तो अवघ्या 23 वर्षांचा होता. निखिलच्या मृत्यूबद्दल कळल्यानंतर सगळ्यांच मोठा धक्का बसला.
निखिलच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या मृत्यूप्रकरणी किक बॉक्सिंग चॅम्पिअनशिपचं आयोजन करणाऱ्या आयोजकांवर आरोप केले आहे. त्यांच्या हलगर्जीपणामुळे निखिलचा जीव गेला, असा आरोप त्यांनी केला आहे. पोलिसांनीही याप्रकरणी गुन्हा करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी मुलाला गमावल्यानं या निखिलच्या आईवडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
लाईव्ह सामन्यात प्रतिस्पर्ध्याच्या पंचमुळे 23 वर्षीय बॉक्सचा मृत्यू pic.twitter.com/ATGX0fPdXw
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) July 15, 2022
काय घडले नेमके ?
ही घटना रविवारी बंगळुरू ज्हाना ज्योती नगर भागातील इंटरनॅशनल बिल्डिंगमध्ये के-1 राज्यस्तरीय किक बॉक्सिंग चॅम्पियनशीप दरम्यान घडली. निखिलने बॉक्सिग स्पर्धेत भाग घेतला होता. बॉक्सिंग रिंगमध्ये निखिल आपल्या विरोधकांला चांगल्या प्रकारे सामना करीत होता. यावेळी प्रेक्षकही त्याला प्रोत्साहन देत होते. यादरम्यान बॉक्सिंग रिंगमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्याकडून एक मुक्का लागल्यानंतर तो खाली कोसळला. त्यावेळी त्याच्या गंभीर जखम झाली होती. यानंतरत्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र बुधवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.