Bermuda Triangle : बर्म्युडा ट्रँगलमध्ये एलिअन्सची एंट्री?? नव्या दाव्याने जगात खळबळ

Bermuda Triangle alien
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Bermuda Triangle । उत्तर अटलांटिक महासागरात वसलेला बर्म्युडा ट्रँगल हा परिसर नेहमीच माणसासाठी गूढ राहिलेला आहे. बर्म्युडा ट्रँगलच्या समुद्रात अनेक विमाने, जहाजे बुडाल्याने मनुष्याला या परिसराची जेवढी भीती आहे, तितकंच त्याबद्दल कुतूहल सुद्धा आहे. बर्म्युडा ट्रँगलमधील विमाने आणि जहाजे बुडण्याच्या घटनांमागे अनेक सिद्धांत आणि कथा असल्या तरी, त्याचे खरे कारण अद्याप पूर्णपणे समजलेले नाही. त्यातच आता एक खळबळ उडवून देणारा दावा समोर आला आहे. बर्म्युडा ट्रँगल हे एलिअन्सचे गुप्त ठिकाण आहे असा दावा अनेक तज्ज्ञांनी आणि खलाश्यांनी केला आहे.

कोलंबसला दिसले होते एलियन्सचे यान- Bermuda Triangle

बर्म्युडा ट्रँगल (Bermuda Triangle) हे ठिकाण उत्तर अटलांटिक महासागरात स्थित असून अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर मियामी (फ्लोरिडा) पासून १७७० किलोमीटर अंतरावर आणि नोव्हा स्कॉशिया, (कॅनडा) येथील हॅलिफॅक्सच्या दक्षिणेस १३५० किलोमीटर (८४० मैल) अंतरावर आहे. १४९२ मध्ये अमेरिकेचा शोध लावणारा महान संशोधक क्रिस्टोफर कोलंबस त्याच्या रोजच्या डायरीत बर्म्युडा ट्रँगल बाबत खळबळजनक लिखाण लिहिले होते. कोलंबसच्या मते, १९४२ साली त्याला विचित्र दिवा दिसला आणि थेट समुद्रात पडला. या घटनेमुळे, कोलंबसचा होकायंत्र खराब झाला. त्याला हा प्रकार अजबच वाटला. ही काही भुताटकी तर नाही ना, अशी शंका त्याच्या मनात त्यावेळी आली होती.

पुढे २००९ मध्ये, बर्म्युडा ट्रँगलजवळ उड्डाण करणाऱ्या काही लोकांनी आकाशात विचित्र प्रकाश पाहिल्याचा दावा केला होता. हे दिवे एका विशिष्ट प्रकारच्या भोवर्याच्या आकाराचे होते. अनेक सिद्धांतकार म्हणतात की हा विचित्र प्रकाश दुसरे तिसरे काही नसून एक एलियन जहाज होता. त्यांच्या मते, बर्म्युडा ट्रँगल हा एलियन्सच्या तळाकडे जाणारा मार्ग आहे. आजपर्यंत, बर्म्युडा ट्रँगलचे (Bermuda Triangle) रहस्य पूर्णपणे कळलेले नाही. ते खरोखरच एलियन्सचे लपण्याचे ठिकाण आहे की ते केवळ नैसर्गिक आणि वैज्ञानिक कारणांमुळे घडलेल्या घटनांचे परिणाम आहे? हे प्रश्न अजूनही आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोन या रहस्याला नैसर्गिक कारणांशी जोडतो. बर्म्युडा ट्रँगल हे असं ठिकाण आहे जिथे चुंबकीय अडथळा खूप जास्त आहे. तसेच, येथे वारे ताशी २५० किलोमीटर वेगाने वाहतात आणि समुद्राच्या लाटा ५० फूट उंच असू शकतात. अशा नैसर्गिक आणि हवामानाच्या कारणांमुळे अनेक जहाजे आणि विमाने या भागात आल्यावर समुद्रात बुडतात.