Best Beers To Try : उन्हाळ्यातही थंडावा देतील या 7 बियर; 250 रुपयांपेक्षा कमी किंमत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Best Beers To Try) उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस आणखीच वाढू लागला आहे. अशात घरातून बाहेर पडताना सुद्धा १०० वेळा विचार करावा लागतोय. असं असलं तरीही उन्हाळ्यात सुट्टीचे जोरदार प्लॅन केले जातात. त्यात चार मित्र भेटले तर काय थंडगार बियरचे क्रेटच्या क्रेट खाली होतात. अनेक लोक म्हणतात की, उन्हाळ्यात अल्कोहोलचे सेवन करणे घातक किंवा त्रासदायक असते. पण, कोल्ड बियरमधले काही प्रकार तुमच्या शरीरातील अंतर्गत तापमान नियंत्रित करू शकतात.

इतकेच नव्हे तर, दिवसातून एक बियर प्यायल्याने स्वभावातील विक्षिप्तपणा दूर राहू शकतो. मूड फ्रेश राहतो. (Best Beers To Try) यासाठी बजेट फ्रेंडली लागर्स, पिल्सनर्स आणि व्हीट बियर पिणे फायदेशीर राहते. कारण या बियर्स उन्हाळ्याच्या उष्णतेवर मात करण्यासाठी मदत करतात. चला तर उन्हाळ्यात थंडावा देणाऱ्या आणि अगदी स्वस्तात मिळणाऱ्या ७ बेस्ट बियर्सविषयी जाणून घेऊया.

सिक्स फील्ड (Best Beers To Try)

जम्मू आधारित DeVANS मॉडर्न ब्रुअरीजद्वारे उत्पादित केलेली ही बेल्जियन शैलीतील व्हीट बियर आहे. जी २ विशेष प्रकारांमध्ये येते. व्हॉल्यूमनुसार ४.५% अल्कोहोल असलेली सिक्स फील्ड्स ब्लँचे आणि व्हॉल्यूमनुसार ५.९% अल्कोहोल सिक्स फील्ड्स कल्ट असे हे दोन प्रकार आहेत. यातील फिल्ड कटची चव थोडी लिंबूवर्गीय तर ब्लँचेला गोड गव्हाचा गंध असतो. ही बियर सर्वसाधारणपणे ३३० मिली १२५ रुपये दराने मिळते.

कार्ल्सबर्ग एलिफंट

कार्ल्सबर्ग एलिफंट ही एक कमाल बियर आहे. ज्यात व्हॉल्यूमनुसार ७% अल्कोहोल असते. सफरचंद, खरबूज, केळीचे प्रबळ ट्रेस असलेल्या या बियरची चव माल्टी असते. (Best Beers To Try) उन्हाळ्यात संध्याकाळच्या वेळी ही बियर पिण्याची अलग मजा असते. सर्वसाधारणपणे ही बियर ५०० मिली १८५ रुपये दराने मिळते.

होईगार्डन Witbier

ही एक बेल्जियन बियर आहे. जी दिसायला गढूळ पिवळी दिसते. तसेच थोडीशी मसालेदार असते. यात संत्र्याची साल, धणे आणि औषधी वनस्पतीचा वापर केलेला असतो. सर्वसाधारणपणे ही बियर ५०० मिली २५० रुपये दराने मिळते.

बी यंग

बी यंग ही माल्टी चवीची बियर फारच लोकप्रिय आहे. (Best Beers To Try) यात व्हॉल्यूमनुसार ७.२% अल्कोहोल असते. ही बियर मसालेदार बार्बेक्यू रिब्सच्या प्लेटसह जोडली जाते. सर्वसामान्यपणे ही बियर ५०० मिली १०० रुपये दराने मिळते.

बिरा ९१ (व्हाईट)

बिरा ९१ (व्हाईट) या बियरमध्ये ४.७% अल्कोहोल असते. ही बियर गव्हापासून बनवलेली लिंबूवर्गीय अन कोथिंबीरच्या हलक्या चवीसाठी प्रसिद्ध आहे. सर्वसामान्यपणे ही बियर ५०० मिली २२० रुपये दराने मिळते.

बिरा ९१ Blonde Summer Lager

बिरा ९१ Blonde Summer Lager ही बियर उन्हाळ्यासाठी खास तयार केली जाते. (Best Beers To Try) ही बियर जर्मन आणि अमेरिकन हॉप्सने बनवलेली ४.५% अल्कोहोलसह सोनेरी रंगाचे आणि ताजेतवाने करणारे स्वादिष्ट पेय आहे. सर्वसामान्यपणे ही बियर ५०० मिली १८० रुपये दराने मिळते.

किंगफिशर प्रीमियम

किंगफिशर प्रीमियम ही बियर सर्व वयोगटातील लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. उन्हाळ्याच्या महिन्यांसाठी अनेक लोक या बियरचा स्टॉक करून ठेवतात. याची कडवाट चव आणि माल्टी गोडपणा समतोल आहे राखून मूड फ्रेश करतात. सर्वसामान्यपणे ही बियर ५०० मिली १४५ रुपये दराने मिळते. (Best Beers To Try)